AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिजेच्या आवाजामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक? WHO चा इशारा काय?

डिजेच्या गजरात नाचताना तुम्हाला कधी वाटलं आहे का की हा आवाज तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो? चला तर मग जाणून घेऊया हे कसं शक्य आहे आणि यामागची कारणं नेमकी कोणती आहेत.

डिजेच्या आवाजामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक? WHO चा इशारा काय?
dj sound
| Edited By: | Updated on: Jul 02, 2025 | 2:45 PM
Share

आजच्या युगात मोठ्या साऊंड सिस्टीम, डीजे, पार्ट्यांमध्ये कानठळ्या बसवणारे आवाज सामान्य झाले आहेत. पण कधी विचार केला आहे का, की ही तीव्र आवाज माणसाच्या मृत्यूचं कारण ठरू शकते? होय, हे केवळ अफवा नाही, तर यामागे वैज्ञानिक कारणे आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) स्पष्ट इशारे आहेत. आवाजाची तीव्रता एक मर्यादा ओलांडली की, ती माणसाच्या मेंदू, हृदय आणि श्रवणशक्तीवर गंभीर परिणाम करू शकते.

डिजेच्या आवाजामुळे होतोय जीवघेणा धोका

लग्नसराई असो वा वाढदिवसाच्या पार्ट्या, डीजे वाजवणं ही आता एक परंपरा झाली आहे. मात्र, हा डीजे कधी माणसाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो, हे लोक विसरून जातात. अनेक अहवाल आणि बातम्यांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की तीव्र आवाजामुळे अनेकांना हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज किंवा अचानक मृत्यू ओढवले आहेत. कारण मानवी शरीराची काही मर्यादा असतात, ज्यापलीकडे जर ध्वनी गेली, तर त्याचा मेंदूवर थेट आघात होतो.

किती डेसिबलपर्यंत आवाज सुरक्षित आहे?

WHO आणि CDC (Centers for Disease Control and Prevention) च्या अहवालानुसार, 70 डेसिबलपर्यंतचा आवाज माणसासाठी सुरक्षित मानला जातो. मात्र 75-80 डेसिबलच्या पुढील आवाज दीर्घकाळ ऐकला तर तो श्रवणशक्तीसाठी घातक ठरतो. हेडफोन किंवा इयरबड्सचा आवाज जर 100 डेसिबलच्या वर गेला तर, तो मेंदूवर आणि हृदयावर ताण आणतो. काही वेळेस तर 185-200 डेसिबल इतका आवाज थेट मृत्यूचे कारण होऊ शकतो.

हे ध्वनी आरोग्यावर कसे परिणाम करतात?

दीर्घकाळ किंवा वारंवार तीव्र आवाज ऐकणे ही अनेक समस्या निर्माण करू शकते. उदाहरणार्थ:

  1. सतत चिडचिडेपणा आणि मानसिक अस्वस्थता
  2. हृदयाचे ठोके अनियमित होणे
  3. उच्च रक्तदाब वाढणे
  4. निद्रानाश, डोकेदुखी आणि लक्ष केंद्रीत न होणे
  5. मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज)
  6. श्रवणशक्ती कमी होणे किंवा पूर्णतः जाणे
  7. 12 ते 35 वयोगटातील तरुण सर्वाधिक धोक्यात

WHO च्या अंदाजानुसार, 12 ते 35 वयोगटातील सुमारे 100 कोटी लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे. कारण या वयोगटातील तरुण मोबाईल, म्युझिक डिव्हाइसेस आणि पार्ट्यांमधील लाउड म्युझिकच्या सतत संपर्कात असतात. त्यामुळे ही माहिती केवळ वाचून न थांबता, कृतीही गरजेची आहे.

काय करावे ?

शक्यतो डीजे, लाउड म्युझिकपासून दूर राहणं, इयरफोनचा मर्यादित वापर करणं आणि सततच्या ध्वनीप्रदूषणापासून संरक्षण घेणं हेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. कारण एकदा का मेंदू, श्रवणशक्ती किंवा हृदयावर या आवाजाचा परिणाम झाला, तर त्यातून सावरणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे “जरा आवाज कमी करा”, ही केवळ तक्रार नव्हे, तर आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.