Exercise On Weekend: फक्त विकेंडला व्यायाम करता? हे जरूर वाचा!

Exercise On Weekend : कामाचा व्याप, व्यस्त दिनचर्या यामुळे अनेकांना आठवडाभर व्यायाम करणयासाठी वेळ मिळत नाही. बऱ्याच व्यक्ती वीकेंडचे दोन दिवस कसून व्यायाम करतात. मात्र हे खरोखरंच फायदेशीर आहे का, जाणून घेऊया.

Exercise On Weekend: फक्त विकेंडला व्यायाम करता? हे जरूर वाचा!
फक्त विकेंडला व्यायाम करता? हे जरूर वाचा!
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jul 27, 2022 | 3:59 PM

नवी दिल्ली: व्यायामासाठी (Exercise) पुरेसा वेळ मिळत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असलेली व्यस्त दिनचर्या, कामाचे वाढते तास, यामुळे घरी आल्यानंतरही व्यायामासाठी एनर्जी उरत नाही. अशा वेळी अनेक जण वीकेंडला, आठवड्यातून केवळ दोन दिवस भरपूर व्यायाम करतात. अवघ्या दोन दिवसांत पाच दिवसांचा व्यायाम करणाऱ्या या लोकांना वीकेंड वॉरिअर्स (Weekend Warriors) म्हटले जाते. पण रोजच्या व्यवस्थित व्यायामाने मिळणारा फायदा वीकेंडच्या हेवी वर्कआऊटने (Workout)मिळतो का? त्या व्यायामाचा खरंच काही फायदा होतो का? व्यायाम का केला पाहिजे? त्याने काय फरक पडतो? रोज व्यायाम करणे आणि विकेंडला व्यायाम करणं यात नेमका काय फरक आहे? त्याचे फायदे तोटे काय आहेत? याबाबत अधिक जाणून घेऊया.

वीकेंड वॉरिअर्स

एका नव्या संशोधनानुसार, जर तुम्हाला संपूर्ण आठवडा बिझी असल्याने आठवडाभर व्यायाम करण्यास जमत नसेल. आणि त्याबदल्यात तुम्ही वीकेंडला, केवळ दोन दिवस कसून वर्कआऊट करत असाल, तर तेही तितकेच फायदेशीर ठरते. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक व्यक्तीने आठवडाभर कमीत कमी 150 मिनिटे म्हणजेच अडीच तास व्यायाम केला पाहिजे. पण रोजच्या व्यापात व्यायाम जमत नसल्याने तुम्ही फक्त वीकेंडला घाम गाळत असाल तर तुम्हाला एका दिवसात किमान 75 मिनिटे म्हणजेच दीड तास तरी व्यायाम केलाच पाहिजे.

आठवड्याभराचा व्यायाम भरून काढा

या अहवालानुसार, व्यायाम सलग 5 दिवस करा किंवा दोन दिवसात हेवी वर्कआऊट करून आठवड्याभराचा व्यायाम भरून काढा, दोन्हीतून मिळणारे फायदे सारखेच आहेत. त्यात फार काही फरक नाही. शरीराची हालचाल होणे, घाम गाळणे महत्वपूर्ण आहे. मात्र आठवडाभर काहीच हालचाल न करता एकाच जागी बसून काम करत राहणे फारसे योग्य नाही. वीकेंडचे उरलेले दोन दिवस व्यायाम करणार म्हणून 5 दिवस काहीच करणार नाही, हे योग्य आहे.

हे सुद्धा वाचा

सतत बसून राहू नका

सतत एका जागी बसून काम करत राहिल्यास पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे असे त्रास होऊ शकतात. वजन वाढू शकते. त्यामुळे दिवसभरात भरपूर व्यायाम जमत नसला तरी काम करताना थोडा ब्रेक घेऊन चालणे, स्ट्रेचिंग करणे, हातापायाचे छोटे व्यायाम करणे गरजेचे आहे. दिवसभरात थोडा वेळ तरी चाललेच पाहिजे. चालण्यासाठी वेगळा वेळ काढणे शक्य नसेल तर जमेल तिथे वाहनाचा वापर न करता चालण्याचा व्यायाम करा, लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा. जेवणानंतर लगेच काम न करता स्ट्रेचिंग करा. घरी आल्यानंतर सतत बसून राहू नका. शक्य तितकी कामे उभे राहून करा. त्यामुळे शरीराची हालचाल होत राहील. आणि उरलेला व्यायाम वीकेंडला करून भरपूर घाम गाळा.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें