Food | प्रोटीन शेक-गोड चहा पिणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा! अन्यथा होऊ शकते शरीराचे मोठे नुकसान

तज्ज्ञांच्या मते, अशी अनेक पेये आहेत ज्यांना आपण आरोग्यासाठी स्वस्थ समजतो आणि आपल्या नियमित आहारात त्यांचा समावेश करतो. मात्र, प्रत्यक्षात ही पेय आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरतात.

Food | प्रोटीन शेक-गोड चहा पिणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा! अन्यथा होऊ शकते शरीराचे मोठे नुकसान
दररोज ही पेय प्यायल्याने गंभीर आजार देखील उद्भवू शकतात.

मुंबई : व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जेव्हा जेव्हा निरोगी आरोग्याचा विचार केला जातो, तेव्हा आपले प्रथम लक्ष आहारावर असते. आहारात पौष्टिक पदार्थ घेतल्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. परंतु, कदाचित आपल्याला हे माहितच नसेल की खाण्यापेक्षा जास्त द्रव पदार्थ पिण्याने शरीराचे नुकसान होते (How protein shake and sugary drinks unhealthy for body).

तज्ज्ञांच्या मते, अशी अनेक पेये आहेत ज्यांना आपण आरोग्यासाठी स्वस्थ समजतो आणि आपल्या नियमित आहारात त्यांचा समावेश करतो. मात्र, प्रत्यक्षात ही पेय आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरतात. दररोज ही पेय प्यायल्याने गंभीर आजार देखील उद्भवू शकतात. चला तर, शरीराला हानी पोहोचवणाऱ्या या पेयांबद्दल जाणून घेऊया…

एनर्जी ड्रिंक्स

जे लोक खेळ किंवा नियमितपणे जिम करतात, ते नेहमी एनर्जी ड्रिंक्स पितात. हे पेय आपल्याला शरीराला केवळ थोड्या काळासाठी ऊर्जा देते. परंतु, याचे दीर्घकालीन सेवन शरीरासाठी खूप हानिकारक ठरते. एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन जास्त असतात, ज्यामुळे अजिबात झोप येत नाही. या व्यतिरिक्त, अशा पेयांमुळे त्वचेमध्ये कोलेजेन पेशींची निर्मिती थांबते, ज्यामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या उद्भवू लागते.

फळांचा रस

बर्‍याच लोकांना माहित आहे की बाजारात टेट्रापॅकमध्ये मिळणाऱ्या फळांच्या रसात कॅलरी आणि साखर जास्त प्रमाणात असते. हा रस आपल्या पाचक संस्थेमध्ये जातो आणि रक्तातील साखर वाढवण्याचे काम करतो. शरीरात साखर वाढल्याने मधुमेह देखील होऊ शकतो. म्हणूनच नेहमी ताज्या फळांचा रस सेवन करावा (How protein shake and sugary drinks unhealthy for body).

प्रोटीन शेक

नियमित जिम करणारे लोक शरीरात प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी नेहमी प्रोटीन शेकचा वापर करतात. तज्ज्ञ म्हणतात की, जे लोक मांस खातात, त्यांना प्रथिने भरपूर प्रमाणात मिळतात, मग अशा लोकांनी प्रोटीन शेक घेण्याची काय गरज आहे. अशी अनेक उत्पादने आहेत ज्यात नैसर्गिक प्रथिने उपलब्ध असतात. जास्त प्रोटीन सेवन केल्याने तुमचे मूत्रपिंड देखील खराब होऊ शकते. शिवाय प्रोटीन शरीराची चरबी वाढवण्यासाठी देखील मदत करतात.

गोड चहा किंवा कॉफी

जर आपण चहा किंवा कॉफीमध्ये जास्त साखर घेत असाल, तर तुम्ही स्वतःहून आजारांना निमंत्रण डेट आहात. या पेयांच्या अति सेवनाने लठ्ठपणा आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन जास्त असते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

हेल्दी ड्रिंक्स

शरीराचे निर्जलीकरण अर्थात डीहायड्रेशन होण्यापासून वाचण्यासाठी पुरेसे पाणी प्या. तसेच, अनहेल्दी ड्रिंक्सऐवजी नैसर्गिक आरोग्यदायी पेय प्या. यासाठी आपण ताज्या फळांचा रस आणि नारळ पाणी पिऊ शकता. गरम पेय आवडत असल्यास चहा किंवा कॉफीऐवजी हळदीचे दूध प्या.

(How protein shake and sugary drinks unhealthy for body)

हेही वाचा :

Published On - 2:32 pm, Wed, 10 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI