AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परफेक्ट लूकसाठी प्रत्येक आऊटफिटसोबत असे निवडा फुटवेअर

आपण जेव्हा बाहेर कार्यक्रमला जाण्यासाठी एखादे आऊटफिट ठरवल्यानंतर त्यासोबत कोणते फुटवेअर घालायचे याबद्दल अनेकजण गोंधळलेले असतात. अशातच तुमचाही गोंधळ होतो का? बाजारात शूजपासून ते हिल्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्ही कोणत्या ड्रेससोबत कोणते फुटवेअर घालता यावर तुमचा लूक परफेक्ट दिसतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आऊटफिटसोबत कोणते फुटवेअर घालावेत...

परफेक्ट लूकसाठी प्रत्येक आऊटफिटसोबत असे निवडा फुटवेअर
परफेक्ट लूकसाठी प्रत्येक आऊटफिटसोबत असे निवडा फुटवेअरImage Credit source: Vincent Besnault/The Image Bank/Getty Images
| Edited By: | Updated on: Jun 01, 2025 | 6:24 PM
Share

फॅशनच्या जगात दररोज एक नवीन ट्रेंड येत असतो. अशातच बहुतेक मुली कोणत्या आऊटफिटसोबत कोणते फुटवेअर घालायचे याबद्दल गोंधळलेल्या असतात. जर तुम्ही तुमच्या आऊटफिटसोबत योग्य फुटवेअर घातले तर त्यामुळे तुमचा लूक परिपुर्ण दिसतो. त्यासोबतच सुंदरता आणि कंफर्ट लक्षात घेऊन फुटवेअर निवडणे हे एक कठीण काम आहे. तुम्ही जेव्हा पारंपारिक आऊटफिट घालत असाल किंवा मॉर्डल ड्रेस घालत असाल तर त्यासोबत तूम्ही योग्य फुटवेअर निवडले नाही तर यामुळे तुमचा संपूर्ण लूक खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ऑफिस, कॉलेज किंवा कोणत्याही पार्टीत जाण्यासाठी परफेक्ट दिसायचे असेल तर तुमच्या ड्रेसनुसार फुटवेअर निवडा.

फुटवेअर हे एक ॲक्सेसरीसारखे आहे त्यामुळे ते तुमचा लूक परफेक्ट दिसतो. योग्य फुटवेअर निवडण्यासाठी, त्यांचा प्रकार, रंग आणि पॅटर्न यावर लक्ष देणे आवश्यक आहे. स्टाइलसोबतच आरामाचाही विचार करून फुटवेअर निवडा जेणेकरून तुमच्या पायांना ते घालण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

कोणत्या आऊटफिटसोबत कोणते फुटवेअर निवडायचे जाणून घ्या

कुर्तीसोबत कोल्हापुरी चप्पल किंवा प्रिंट सँडल घाला

जर तुम्हाला कुर्ती किंवा सलवार सूट घालण्याची आवड असेल तर फुटवेअरकडेही विशेष लक्ष द्या. ते तुमचा लूक वाढवण्याचे काम करते. जेव्हा तुम्ही कुर्ती किंवा सूट घालता तेव्हा ते कोल्हापुरी चप्पल किंवा राजस्थानी प्रिंट शूज घाला.

शर्ट आणि जीन्ससह शूज घाला

जर तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजला गेलात तर तुम्ही बहुतेकदा शर्ट, टॉप किंवा जीन्स घालता. पण कधीकधी कोणते फुटवेअर घालायचे याबद्दल गोंधळ होतो, अशावेळेस तुम्ही फुटवेअर घालू शकता. लक्षात ठेवा की जर तुम्ही रोजच्या वापरासाठी शूज खरेदी करत असाल तर काळा, तपकिरी, पांढरा किंवा बेज रंग निवडा कारण हे रंग तुमच्या आऊटफिटला एक परिपूर्ण लूक देतात.

ड्रेससोबत हिल्सच्या सँडल घाला

जर तुम्ही पार्टीला जात असाल आणि ड्रेस घालण्याचा विचार करत असाल, तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे ब्लॅक ब्लॉक हील्स किंवा ब्लॅक लेस हील्स जे तुमचा लूक वाढवू शकतात. पण जर तुम्ही ऑफिसमध्ये ड्रेस घालत असाल आणि तुम्हाला आरामदायी लूक हवा असेल तर तुम्ही शूज किंवा सँडल घालू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.