तुमची मुलं सुद्धा वारंवार मोबाईल फोनचा वापर करतात? तर ‘या’ 5 उपायांचा अवलंब एकदा कराच
डिजिटलायझेशनच्या या युगात मोबाईल फोन खूप महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे लहान मुलांनाही मोबाईलचे व्यसन लागले आहे. जेव्हा आपल्या घरातील लहान मुल एखाद्या मोठ्या व्यक्तीला दिवसभर मोबाईल वापरताना पाहतात तेव्हा ते त्यांच्याकडून मोबाईल मागण्याचा आग्रह धरतात. अशाने मुलांना मोबाईल फोन वापरण्यास सुरूवात करतात. सततच्या वापराने मुलांचे डोळे तर कमकुवत होतातच पण मेंदूचाही योग्य विकास होत नाही. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या मुलाच्या मोबाईल वापरण्याची सवय सोडवायची असेल तर या 5 सोप्या मार्गांचा अवलंब करा.

आजकालची लहान मुलं ही मोबाईलशिवाय जेवणही करत नाहीत. जर तुम्ही त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला तर ते रडू लागतात. त्याचे हे व्यसन इतके वाढले आहे की मुले शारीरिक हालचालींपासून दूर गेली आहेत आणि लहान वयातच आजारांना बळी पडत आहेत. कधीकधी असे देखील घडते की त्यांना मोबाईलवर काही गोष्टी दिसतात ज्या त्यांच्यासाठी योग्य नसतात. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्या गोष्टींचा परिणाम होतो. मोबाईलच्या व्यसनामुळे काही मुले लठ्ठही झाली आहेत, असे अनेक अहवालांमधून समोर आले आहे. चिडचिडेपणा, चिंता, ताण यासारख्या समस्या अगदी लहान वयातच उद्भवू लागले असल्याचे समोर आले आहे. अनेकदा पालक त्यांच्या मुलांना फोनच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी त्यांना फटकारतात किंवा मारहाण करतात परंतु ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे.
मुलांच्या मागण्या पूर्ण झाल्यावर ते हट्टी होतात, त्यांना माहित असते की जर त्यांनी आग्रह धरला तर त्यांच्या मागण्या पूर्ण होतील. म्हणूनच जेव्हा ते फोन मागतात तेव्हा तुम्ही त्यांना तो देता आणि त्यामुळे मोबाईल वापरणे त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग बनते आणि हळूहळू ही सवय कधी मोबाईलच्या व्यसनात बदलते हे तुम्हाला कळतही नाही. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून कसे मुक्त करायचे.
लहान मुलांमधील फोनच्या सवयीपासून मुक्त होण्याचे सोपे मार्ग
पालकांनी फोनचा वापर कमी करावा
जेव्हा तुमचं मूल लहान असते तेव्हा तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करून गोष्टी शिकतो. त्यामुळे तुम्ही जर दिवसभर फोनवर व्यस्त राहिले तर मुलाची उत्सुकता देखील वाढते आणि त्याला फोन वापरण्याची इच्छा देखील होते. यासाठी तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तीनी तसेच पालकांनी मुलांसमोर मोबाईल फोनचा वापर कमी करावा.
मुलांना समजावून सांगा
जर तुम्हाला तुमच्या मुलांची फोनची सवय सोडायची असेल, तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा की फोन वापरणे त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कारण जर तुम्ही मुलांवर ओरडून किंवा मारहाण करून काही करण्यापासून रोखले तर ते हट्टी होतात आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करतात.
ॲक्टिव्हिटी करा
तुमची मुलं आग्रह धरतात तेव्हा त्यांना फोन देण्याऐवजी, तुम्ही त्यांच्यासोबत काही खेळ खेळा. त्यांना नवीन क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज मध्ये सहभागी करून घ्या. जसे चित्रकला, संगीत, नृत्य, योग, खेळ. हे केवळ मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करणार नाही तर मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील हा सर्वोत्तम पर्याय आहे.
वेळापत्रक बनवा
तुमचे मूल दिवसभरात जे काही करेल, म्हणजे मुलं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत, त्यांच्या दिनचर्येच्या वेळा निश्चित करा. यामुळे मुलाला संपूर्ण दिवस काय करायचे हे देखील कळेल. या वेळापत्रकात, तुम्ही त्यांच्या झोपण्याच्या, खाण्याच्या, खेळण्याच्या आणि अभ्यासाच्या वेळा फिक्स करा. यानंतर त्यांना दिवसातून फक्त 20 ते 30 मिनिटे फोन दाखवा.
मुलांजवळ फोन ठेवू नका
मुलांजवळ फोन ठेवू नका. त्यांना फोन वापरण्याचा मोह कमी व्हावा म्हणून तुम्ही फोन त्यांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रात्रीच्या वेळी, फोन मुलांच्या जवळ ठेवू नये याची विशेष काळजी घ्या. तसेच तुमची मुलं तुमच्या देखरेखीपासून फोन वापरत नाही याची काळजी घ्या. यासाठी फोन मुलांपासून लांब ठेवा जेणेकरून त्यांना तो मिळू शकणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.) —————————————————————-
—————————————————————-
—————————————————————-
