AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांसाठी ड्रायफ्रूट्स किती आणि कसे द्यावेत? जाणून घ्या योग्य प्रमाण, वेळ आणि पद्धत

ड्रायफ्रूट्स म्हणजे पौष्टिकतेचा खजिना! पण लहान मुलांना ते किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने द्यावेत, हे माहिती नसल्याने अनेक पालक चुकतात. म्हणूनच जाणून घ्या, ड्रायफ्रूट्स देण्याची योग्य वेळ, मात्रा आणि पद्धत.

मुलांसाठी ड्रायफ्रूट्स किती आणि कसे द्यावेत? जाणून घ्या योग्य प्रमाण, वेळ आणि पद्धत
Dry FruitsImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 15, 2025 | 7:05 PM
Share

आजच्या स्पर्धात्मक काळात प्रत्येक पालक आपल्या मुलाचं आरोग्य, वाढ आणि मेंदूचा विकास उत्तम व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतो. यासाठी घरगुती आहारात नैसर्गिक पोषणमूल्य असलेले पदार्थ देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात “ड्रायफ्रूट्स” म्हणजेच सुकामेवा हा एक असा घटक आहे, जो मुलांच्या एकूण वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मात्र, प्रत्येक वयोगटासाठी त्याचं योग्य प्रमाण, योग्य प्रकार आणि योग्य वेळ हे ठरवणं तितकंच आवश्यक आहे.

डॉक्टर्स आणि न्यूट्रिशन तज्ज्ञांच्या मते, मुलांना योग्य प्रमाणात आणि योग्य वयानुसार ड्रायफ्रूट्स दिल्यास त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीपासून मेंदूच्या कार्यक्षमतेपर्यंत अनेक फायदे होतात. खाली दिले आहेत काही प्रमुख आणि सुरक्षित ड्रायफ्रूट्स आणि त्यांचे फायदे:

बदाम (Almonds)

फायदे: मेंदूचा विकास, लक्ष केंद्रित करणे, हाडं मजबूत होणे

कसा द्यावा: 2-3 बदाम रात्री भिजत टाका, सकाळी सोलून मुलांना द्या. लहान मुलांना त्याचा पेस्ट किंवा पावडर करून दुधात घालून देता येतो. यामुळे बदामाचे सारे पोषक घटक सहज मिळतात.

अक्रोड (Walnuts)

फायदे: ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा उत्तम स्रोत, मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त

कसा द्यावा: 2-5 वर्षाच्या मुलांना अर्धा अखरोट पेस्ट करून द्यावा. 5 वर्षांवरील मुलांना 1 अखरोट रोज दिला जाऊ शकतो.

मनूका (Raisins)

फायदे: आयर्न, पचनासाठी फायदेशीर, थकवा कमी करतो

कसा द्यावा: 4-5 किशमिश रात्री भिजवून सकाळी मुलांना द्या. यात नैसर्गिक साखर जास्त असते, त्यामुळे प्रमाण राखणं गरजेचं आहे.

अंजीर (Figs)

फायदे: फायबरने भरपूर, मलावष्टंभ टाळतो, पचन सुधारतो

कसा द्यावा: 1 अंजीर भिजवून नरम झाल्यावर 2 वर्षांवरील मुलांना दिला जाऊ शकतो.

खजूर (Dates)

फायदे: त्वरीत ऊर्जा देतो, आयर्न व पोटॅशियमचा उत्तम स्रोत

कसा द्यावा: लहान मुलांना खजुराचा पेस्ट करून दूधात मिसळून द्या. 2-3 वर्षांनंतर साबूत खजूर दिला जाऊ शकतो, पण चावण्याची क्षमता लक्षात घ्या.

पिस्ता (Pistachios)

फायदे: प्रोटीन, हेल्दी फॅट्स, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो

कसा द्यावा: बिनमीठाचा पिस्ता बारीक करून पावडर स्वरूपात किंवा 1-2 पिस्ते बारीक तुकड्यांमध्ये द्या.

सावधगिरीचे उपाय:

1 वर्षाखालील मुलांना कधीच साबूत ड्रायफ्रूट्स देऊ नका, कारण त्यांना गिळताना अडचण (चोकिंग) होण्याचा धोका असतो.

2. नेहमी ड्रायफ्रूट्स भिजवून किंवा त्याची पेस्ट करून द्या.

3. जर मुलाला नट्सची अ‍ॅलर्जी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच द्या.

4. अति प्रमाण टाळा, कारण खूप जास्त ड्रायफ्रूट्स खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस किंवा अपचन होऊ शकतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.