Perfectus Tea : चहा बनवताना आधी काय टाकायचं, दूध की पाणी? 99 टक्के लोक करतात ही मोठी चूक
चहा हे भारतीय लोकांचं सर्वात आवडतं पेय आहे, मात्र असं असून देखील चहा बनवण्याची योग्य पद्धत काय आहे, तो कसा बनवायचा? याची माहिती अनेकांना नसते, त्यामुळे आज आपण चहा बनवण्याची योग्य पद्धत काय आहे. आधी कोणत्या वस्तू चहामध्ये टाकायच्या, नंतर कोणत्या टाकायच्या याची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय लोकांसाठी चहा फक्त एक पेय नाही, तर सकाळी आपल्या डोळ्यावरची झोप घालवण्याचा, आपल्याला आलेली मरगळ घालवण्याचा एक रामबाण उपाय आहे. काही लोकांना तर चहा इतका आवडतो, की सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही. चहा पिताच त्यांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते, त्यांचा थकवा दूर होतो. चहा कितीदा प्यावा याचं असं काही बंधन नाही, म्हणूनच म्हणतात चहाला काही वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. मात्र साधारणपणे दिवसातून दोनदा तरी आपण चहा पितोच, एकदा सकाळी आणि दुसर्यांदा सायंकाळी पाचच्या सुमारास, जर समजा आपल्याला दुपारचा चहा मिळाला नाही तर आपलं डोकं दुखू लागतं, थकवा जाणवतो. असं तुमच्यासोबतही अनेकदा घडलंच असेल. मात्र अनेक जण चुकीच्या पद्धतीनं चहा बनवत असतात, चहा बनवण्याची योग्य पद्धत काय आहे? त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
चहा बनवण्याची योग्य पद्धत
परफेक्ट चहा बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्ही चहाच्या पातिल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये दोन कप पाणी टाका, त्यानंतर चहा पावडर टाका, तुम्हाला ज्या प्रमाणात चहा बनवायचा आहे, त्याप्रमाणात या पाण्यामध्ये चहा पावडरचं प्रमाण ठेवा. प्रति कप चहासाठी चहा पावडरचं प्रमाण अर्धा चमच्या इतकं ठेवावं. पाण्यात चहा पावर टाकल्यानंतर, आता साखर टाका, साखरेचं प्रमाण एका कप चहासाठी सामान्यपणे दोन चमचे इतकं ठेवावं. हे पाणी आता चांगलं उकळून घ्या आणि त्यानंतर त्यात दूध टाका, म्हणजे चहाला चांगला स्वाद येईल, तुमचा चहा कडक बनेल. असा चहा घेतल्यामुळे तुमचा सर्व थकवा गायब होईल.
जर दूध आधीच उकळलेलं असेल तर मग तुम्ही पाणी, दूध, साखर आणि चहा पावडर या सर्व वस्तू एकत्रितपणेच टाकू शकतात. अशावेळी चाहा जास्त उकळू देऊ नका, तुमचा चहा तयार झाल्यानंतर तुम्ही चहामध्ये चवेनुसार इलायची, आदरक असे पदार्थ देखील टाकू शकतात. काही जणांना हे पदार्थ आवडतातच असं नाही, मात्र डोकेदुखीसाठी आदरक असलेला चहा हा चांगला उपाय देखील ठरू शकतो.
