AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनिमूनसाठी हॉटेलमध्ये राहताय तर या 6 गोष्टींना अजिबात हात लावू नका; कारण जाणून बसेल धक्का

हनिमूनसाठी किंवा कोणत्याही प्रवासात हॉटेल निवडताना उत्तम सुविधा सर्वात आधी पाहिली जाते. पण हॉटेलमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हॉटेल रुममधील अशा काही 5 वस्तू असतात ज्यांना चुकूनही हात लावला नाही पाहिजे. आणि बहुतेकजण ही चूक करतात. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. जाणून घेऊयात की हॉटेलमधील त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी हात लावताना दहा वेळा विचार करणे गरजेचे आहे.

हनिमूनसाठी हॉटेलमध्ये राहताय तर या 6 गोष्टींना अजिबात हात लावू नका; कारण जाणून बसेल धक्का
If you are staying in a hotel, you should avoid touching or using certain items in the hotel roomImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 15, 2025 | 1:35 PM
Share

आपण पिकनीकला जातो तेव्हा किंवा एखादे कपल हनिमूनसाठी जातात तेव्हा राहण्यासाठी चांगल्या सुविधा असलेलं एक चांगलं हॉटेल पाहतात. जेणेकरून राहताना कोणत्याही सुविधांची कमतरता जाणवणार नाही. पण कोणत्याही आणि कितीही लक्झरी हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेलात तरी देखील काही गोष्टींबद्दल नक्कीच दक्षता बाळगली पाहिजे. जसं की हॉटेलमधील बुक केलेल्या रुममध्ये गेल्यावर सर्वात आधी सुरक्षेच्या दृष्टीने आपण कुठे छुपे कॅमेरे आहेत का हे पाहतो. त्याचपद्धतीने रुममध्ये गेल्यानंतर अजून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी जेणेकरून नंतर पश्चाताप होणार नाही. ते म्हणजे रुममध्ये गेल्यानंतर तेथील 5 गोष्टींना अजिबात हात लावू नका. त्यामागे असणारं कारण आणि त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊयात.

हॉटेलच्या रुममधील या गोष्टींना कधीच हात लावू नका

बेडशीट

जर तुम्हाला बेडशीटवर छोटासा तरी डाग दिसला किंवा काळपटपणा दिसला तर ती बेडशीट बललेली नाही हे लक्षात घ्यावं. अशावेळी त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब हाऊसकिपींगवाल्यांना बोलावून ती बेडशीट बदलायला सांगा. कारण त्यावर अनेक बॅक्टेरीया असतात. ते नक्कीच आरोग्यासाठी चांगेल मानले जात नाही.

रजाई

जेव्हा कधी तुम्ही हॉटेलमध्ये राहाल तेव्हा प्रयत्न करा की तुमचे छोटेसे का होईना पण स्वतःचे ब्लँकेट किंवा रजाई तुम्ही घेऊन जा. एका अहवालानुसार, हॉटेलमधील ब्लँकेट आणि रजाई वर्षातून फक्त चार वेळा बदलल्या किंवा स्वच्छ केल्या जातात. या काळात किती लोकांनी त्याचा वापर केला असेल, ते ब्लँकेट त्यांनी कसे वापरले असतील याबद्दल नक्कीच आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे छोटे ब्लँकेट,रजाई मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात. जे तुम्ही घेऊन जाऊ शकतात.

उशाचे कव्हर

बहुतेक हॉटेल्समध्ये, उशांवरील फक्त धूळ साफ करून ते पुन्हा ठेवले जातात. तुम्हाला जरी त्यावर कोणतेही डाग दिसले नाहीत तरी देखील त्या उशावर किती लोक झोपले असतील किंवा किती दिवस ते कव्हर धुतलेले नसतील हे आपण सांगू शकत नाही. म्हणून, एकतर रुममधील उशा वापरणे टाळा किंवा उशांचे कव्हर कधी बदलले आहेत हे हॉटेलवाल्यांना स्पष्टपणे तुम्ही विचारू शकता.

फोन

हॉटेलच्या रुममध्ये असलेल्या टेलिफोनवर देखील कितीतरी जर्म असतात. जेव्हा तुम्ही रुममधील टेलिफोन उचलता तेव्हा तुमच्यावर शेकडो जंतू हाताला, चेहऱ्यावर लागत असतील. कारण अशा वस्तू नक्कीच तेवढ्या काळजीपूर्वक स्वच्छ केल्या जात नाहीत. हॉटेलमध्ये असताना टेलिफोन वापरण्याआधी नेहमी स्वच्छ करायला विसरू नका.

टीव्ही रिमोट

टीव्ही रिमोटला स्पर्श करणे देखील जंतूंचा स्रोत असू शकते. बरेच लोक अनेकदा टीव्ही रिमोट बाथरूममध्ये घेऊन जातात, घाणेरड्या जागी ठेवतात आणि नंतर हातही धुत नाहीत. तशाच हातानी किंवा जेवताना देखील तसेच हात कित्येक का लोक रिमोटला लावतात. त्यामुळे ते नक्कीच तेवढे सुरक्षित नाही. त्या रिमोटवर कितीतरी जंतू असू शकतात.त्यासाठी कधीही हॉटेलमधल्या रुममधील रिमोट वापरताना तो आधी टिशूने वैगरे पुसून घ्या.

ग्लास आणि मग

एका अहवालात असे उघड झाले आहे की काही हॉटेलमध्ये तेथील कर्मचारी रुममधील ग्लास आणि मग धुतल्याशिवाय, स्वच्छ केल्याशिवाय तसेच ठेवून देतात. तो ग्लास आणि मग तुमच्या आधी त्या रुममध्ये राहत असलेल्यांपैकी कितीजणांनी तरी वापरला असेल. त्यासाठी ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यासाठी शक्यतो हॉटेलच्या रुममध्ये ठेवलेला मग किंवा पेला स्वच्छ आहे की नाही याची खात्री न करता वापरू नका. शक्यतो रुममधील ग्लास, एखादं ठेवलेलं भांड वापरणे टाळा. त्याऐवजी तुमच्याकडे असलेल्याच पाण्याचा बॉटलचा वापर करा.

अजित पवारांचा अपघाताआधीचा विमान घिरट्या मारतानाचा भयंकर व्हिडीओ
अजित पवारांचा अपघाताआधीचा विमान घिरट्या मारतानाचा भयंकर व्हिडीओ.
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.