डिलिव्हरीनंतर वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात, तर एकदा ‘हे’ ट्राय करा

गरोदर महिलांची डिलिव्हरी झाली म्हणजे तिचा सर्व त्रास संपल्या असे अनेकांना वाटते. मात्र, डिलिव्हरी झाल्यानंतर अनेक महिलांची पोटाची चरबी वाढणे.

डिलिव्हरीनंतर वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात, तर एकदा 'हे' ट्राय करा

मुंबई : गरोदर महिलांची डिलिव्हरी झाली म्हणजे तिचा सर्व त्रास संपल्या असे अनेकांना वाटते. मात्र, डिलिव्हरी झाल्यानंतर अनेक महिलांची पोटाची चरबी वाढणे. गरोदरपणावेळी स्त्रियांचे वजन वाढणे एक सामान्य गोष्ट आहे, परंतु गरोदरपणाचा काळ संपला आणि डिलिव्हरी झाली की हे वजन कमी करणे अतिशय कठीण होऊन बसते. गर्भात बाळासाठी जागा व्हावी म्हणून स्नायू आणि पेशी स्वत:हून प्रसारण पावतात व जागा बनवतात. (If you are suffering from increased weight after delivery, then follow these tips)

एवढेच नाही तर बाळाला जागा व्हावी म्हणून छोटे आतडे आणि पोट सुद्धा एका बाजूला थोडे शिफ्ट होते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून पोटाची चरबी वाढलेली दिसते आणि डिलिव्हरी झाल्यावर हि चरबी स्त्रीला नकोशी होते, कारण त्यामुळे शरीर विचित्र वाटते आणि तिच्यामध्ये न्यूनगंड सुद्धा निर्माण होऊ शकतो. तर आज आम्ही तुम्हाला पोटावरची चरबी कशी कमी करायची हे सांगणार आहोत, चला जाणून घेऊया.

-मूग दाळीचा सूप डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा सूप तयार करण्यासाठी तुम्हाला अर्धा कप संपूर्ण मूग डाळ, एक चमचे तेल, चार चमचा जिरे, कढीपत्ता, एक चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि दोन चमचे लिंबाचा रस आवश्यक आहे.

-सर्वात अगोदर मूग डाळ पाण्याने चांगली धुवा.

-मूगाच्या डाळीमध्ये एक कप पाणी घालून ते कुकरमध्ये ठेवा आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्या

-यानंतर गॅस बंद करा आणि कुकरला थंड होऊ द्या

-आता पॅनमध्ये तेल गरम करा आणि नंतर त्यात जिरे घाला.

-जिऱ्यामध्ये कढीपत्ता, हिंग आणि मूग डाळ घाला.

-आता गॅस बंद करून हा सूप एका भांड्यात ठेवावा आणि त्यात लिंबू घाला

हा मूगाच्या डाळीचा सूप महिलांनी दररोज घेतला तर त्यांचे वजन कमी होईल. मूग डाळात फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी 9 असते, जे शरीराला नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. हे विशेषतः लाल रक्त पेशींसाठी फायदेशीर आहे. मूग डाळ अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते रक्त रक्तवाहिन्यास मुक्त रॅडिकल्‍समुळे होणारे नुकसान कमी करते.

संबंधित बातम्या : 

(If you are suffering from increased weight after delivery, then follow these tips)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI