AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील मुरुमामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ पदार्थ खाणे टाळाच…

धूळ आणि प्रदूषण याचा सरळ परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. यामुळे चेहऱ्यावर चेहऱ्याचा अनेक समस्या निर्माण होतात.

चेहऱ्यावरील मुरुमामुळे त्रस्त आहात? मग 'हे' पदार्थ खाणे टाळाच...
आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात. यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अर्थात मुरूम येतो. चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय करू शकतो.
| Updated on: Mar 21, 2021 | 1:27 PM
Share

मुंबई : धूळ आणि प्रदूषण याचा सरळ परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. यामुळे चेहऱ्याचा अनेक समस्या निर्माण होतात. अनेक आैषधे घेऊन सुध्दा त्वचेचा समस्या दूर होत नाहीत. त्यामध्ये अनेक जणांना चेहऱ्यावरील मुरुमाची मोठी समस्या असते. अनेक आैषधे घरगुती उपाय देखील करून त्यांच्या चेहऱ्यावरचा मुरुम जात नाही. नुसते आैषधे घेऊन हा मुरुम जात नाही तर यासाठी तुम्हाला आहारात बदल करावा लागतो.  (If you want to get rid of pimples on your face follow these tips)

-चेहऱ्यावर मुरुम येण्याचे मुख्य कारण म्हणजे आहारात घेण्यात येणारे साखर युक्त पदार्थ यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरुम येतो.

-आपल्या रक्तात आयजीएफ 1 नावाचा हार्मोन असतो जो दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळतो. या हार्मोनमुळे चेहऱ्यावर मुरुम येतात.

-चा्ॅकलेट कधी तरी खाणे चांगले असते. मात्र, तुम्ही दररोजच चा्ॅकलेट खात असाल तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतो.

-आहारात जास्त तेलकट पदार्थांचा समावेश केला तर चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे आहारात शक्यतो तेलकट पदार्थ घेणे टाळाच

-आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. चेहऱ्यावरील मुरुमामुळे तुम्ही त्रस्त असाल तर कोरफडचा रस आपल्या चेहऱ्याला लावा आणि 20 ते 30 मिनिटे तसेच ठेवा.

-बर्गर, पिझ्झा, सोडा इत्यादी चरबीयुक्त किंवा मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर केलेले पदार्थांमुळे मुरुम येतो. या पदार्थांमुळे शरीरात हार्मोन्सचे प्रमाण वाढते.

-नारळाचे तेल त्वचेसाठी नेहमीच फायदेशीर असते. हे चेहऱ्यावर मॉईश्चरायझर म्हणून काम करते जे त्वचेला मुरुमापासून दू ठेवण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(If you want to get rid of pimples on your face follow these tips)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.