Immunity Booster | वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर, कोरोना काळात इम्युनिटी वाढवण्यासाठी गुणकारी ‘ग्रीन टी’!

ग्रीन टीचा विचार केला तर, बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठीच तिचे सेवन करतात. परंतु, इतकेच नाही तर, ग्रीन टी (Green Tea) आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवून अनेक आजारांपासून देखील आपले संरक्षण करू शकते.

Immunity Booster | वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर, कोरोना काळात इम्युनिटी वाढवण्यासाठी गुणकारी ‘ग्रीन टी’!
ग्रीन टी
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 9:02 AM

मुंबई : ग्रीन टीचा विचार केला तर, बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठीच तिचे सेवन करतात. परंतु, इतकेच नाही तर, ग्रीन टी (Green Tea) आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवून अनेक आजारांपासून देखील आपले संरक्षण करू शकते. लो-कॅलरी ग्रीन टी एक सुपरड्रिंक आहे आणि जर आपण त्यात काही नैसर्गिक घातक मिसळले तर त्याचे फायदे आणखी वाढतात (Immunity Booster green tea is beneficial to boost immunity power during corona pandemic).

बर्‍याच अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स व्यतिरिक्त कॅटेचिन नावाचे पॉलीफेनॉल देखील आढळते. या दोन्ही गोष्टी आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यास मदत करतात. तसेच, ग्रीन टीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म देखील असतात, जे बॅक्टेरिया आणि विषाणूच्या वाढीस प्रतिबंध करतात. म्हणून, जर आपण दररोज 1 कप ग्रीन टी पिण्यास प्रारंभ केला, तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

कोरोनाच्या काळात ग्रीन टीमध्ये मिसळा ‘हे’ घटक

ग्रीन टीची पाने, श्याम आणि राम (काळी आणि हिरवी) तुळशीची पाने 15, आले, लिंबू, मध, बारीक मेथी दाणे, गिलॉय काठी, अश्वगंधा, ताज्या कडुलिंबाची पाने, दालचिनी, लवंगा, मिरपूड, कच्ची हळद किंवा आंबे हळद, काळे मीठ आणि ताजी पुदीना पाने.

‘ग्रीन टी’ बनवण्याची पद्धत

चमचाभर मेथी दाणे, गिलॉय काठी, अश्वगंधा, कडुलिंबाची पाने, अर्जुन सालची भुकटी, दालचिनी, लवंगा, काळी मिरी, आले आणि कच्ची हळद रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. या सर्व गोष्टी सकाळी ग्राइंडरमध्ये चांगल्या वाटून घ्या (Immunity Booster green tea is beneficial to boost immunity power during corona pandemic).

आता एका भांड्यात 1 ग्लास पाणी घाला आणि त्यात हे वाटलेले मिश्रण घालून त्यात 15 मिनिटे चांगले उकळा. जेव्हा हे मिश्रण पाण्यात व्यवस्थित मिसळेल आणि ते पाणी उकळून केवळ पाव ग्लास शिल्लक राहील, तेव्हा गॅस बंद करा, त्यात ग्रीन टीची पाने घाला आणि 5 मिनिटे झाकून ठेवा. नंतर ते एका कपात गाळून त्यात लिंबाचा रस, मध, एक चिमूटभर मीठ आणि तीन पुदीना पाने मिसळा. तयार आहे आपला खास ग्रीन टी! आपल्या सकाळची सुरुवात या हेल्दी पेयाने करा.

आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर!

– मेथी आपले ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर नियंत्रणास मदत करते.

– आले शरीराला ऊर्जा देते, तर लिंबू व्हिटामिन सी वाढवण्या बरोबरच चरबी कमी करते.

– मध पोट साफ करते आणि ते डोळ्यांसाठी देखील चांगले आहे.

– पुदिना पचन संस्था तंदुरुस्त ठेवते आणि उन्हाळ्यात अपचनाची समस्या रोखते.

– गिलॉय, अर्जुन साल, अश्वगंधा, दालचिनी, मिरपूड आणि हळद आपली प्रतिकारशक्ती मजबूत करते.

 (टीप : टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(Immunity Booster green tea is beneficial to boost immunity power during corona pandemic)

हेही वाचा :

Weight Loss Tips | वजन कमी करण्यासाठी आहारात करा ‘मखाणा’चा समावेश, जाणून घ्या याचे अनेक फायदे!

Immunity Booster Drinks | कोरोना काळात या ‘5’ पेयांनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.