AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकर यश हवे आहे? मग रात्री झोपण्यापूर्वी करा हे एक काम

सेल्फ रिव्यू ही यशस्वी लोकांची खास सवय असते. दररोज रात्री काही मिनिटे दिवसभरातील कृतींचा आढावा घेतल्यास आपण काय चांगलं केलं, कुठे चुका केल्या आणि काय सुधारणा करता येतील हे स्पष्टपणे समजते. यामुळे आत्मपरीक्षणाची सवय लागते,

लवकर यश हवे आहे? मग रात्री झोपण्यापूर्वी करा हे एक काम
self goal
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 10:55 PM
Share

यशस्वी होण्यासाठी केवळ कष्ट करणे पुरेसे नसते, तर स्वतःच्या कामाचे आत्मपरीक्षण करणेही तितकेच गरजेचे असते. अनेक महान व्यक्तींनी त्यांच्या यशाचे रहस्य सांगताना ‘सेल्फ रिव्यू’ म्हणजेच स्वतःचे दररोज मूल्यमापन करण्याचा सल्ला दिला आहे. हा एक असा सवय आहे जी आपले विचार, कृती, सवयी आणि निर्णय यांचा नियमित आढावा घेण्यास मदत करते.

सेल्फ रिव्यू का आवश्यक आहे ?

आपण दिवसभर काय शिकलो, काय चुकलो आणि काय सुधारणा शक्य आहे हे ओळखण्यासाठी सेल्फ रिव्यू अत्यंत प्रभावी आहे. यामुळे आपल्या चुका वेळेवर लक्षात येतात आणि त्या सुधारण्याची संधी मिळते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि निर्णयक्षमता अधिक प्रगल्भ होते.

महान व्यक्तींचा यशस्वी फॉर्म्युला

जगातील बहुतांश यशस्वी व्यक्ती मग ते उद्योजक असो, खेळाडू असो, शास्त्रज्ञ असो किंवा नेते असो सर्वजण आपल्या कामाचा दररोज आढावा घेतात. उदाहरणार्थ, महात्मा गांधी, बेंजामिन फ्रँकलिन, बिल गेट्स यांनी आपल्या डायरीमध्ये दररोजच्या कामाची नोंद ठेवण्याची सवय जपली आहे. यामुळे त्यांना स्वतःतील बदल, चुका आणि प्रगती याचे नेमके मूल्यांकन करता येते.

सेल्फ रिव्यू कसे करावे?

1. शांत कोना शोधा: रोजच्या गडबडीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांत जागी बसा.

2. स्वतःला प्रश्न विचारा: आज मी काय चांगलं केलं? काय चुकीचं झालं? मी काय नवीन शिकलो? मला कोणती सवय बदलायला हवी?

3. उत्तरं लिहून काढा: डायरीमध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहा. यामुळे विचार अधिक स्पष्ट होतात.

4. स्वतःला दोष देऊ नका: जजमेंटल न होता फक्त निरीक्षण करा. चुका झाल्या तरी त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा.

5. हळूहळू सुधारणा करा: तत्काळ परिपूर्णता न मिळवता थोड्या थोड्या सुधारणा करा. सातत्य ठेवा.

कोणत्या चुका टाळाव्यात?

  • ओव्हरथिंकिंग: सेल्फ रिव्यू करताना अति विचार करणे टाळा. फक्त वस्तुनिष्ठ मूल्यांकन करा.
  • दोषारोप न करणे: स्वतःला किंवा इतरांना दोष देण्याऐवजी सकारात्मक उपाय शोधा.
  • सतत नकारात्मक विचार करणे: चुका लक्षात घेताना सकारात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करा.

सेल्फ रिव्यूचे फायदे

सेल्फ रिव्यू केल्याने अनेक सकारात्मक बदल घडतात. सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढतो. आपण दिवसभरात काय केलं याचा आढावा घेतल्याने चुकीच्या गोष्टी वेळेवर लक्षात येतात आणि त्या सुधारण्याची संधी मिळते. हे मूल्यांकन केल्यामुळे निर्णयक्षमता अधिक प्रगल्भ होते आणि भविष्यातील अडचणींना तोंड देण्याची तयारी होते. त्याचबरोबर मानसिक स्थैर्य टिकून राहतं आणि आयुष्य अधिक शिस्तबद्ध बनतं. दररोजच्या लहान लहान सुधारणा हळूहळू मोठे सकारात्मक बदल घडवतात, जे दीर्घकालीन यशासाठी उपयुक्त ठरतात.

दररोज फक्त १० मिनिटे देऊन सुरुवात करा

रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटांचा सेल्फ रिव्यू केल्यास तुमच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतील. ही सवय तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अधिक प्रगल्भ बनवेल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.