AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासह पचनक्रिया राहील चांगली, फक्त आहारात समावेश करा नाचणीची आंबील, जाणून घ्या सोपी रेसिपी

उन्हाळ्यात पचनाच्या समस्या सामान्यपणे आढळतात. हे टाळण्यासाठी, आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे, जे पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात, तसेच शरीराला आतून थंड ठेवतात. अशीच एक पाककृती म्हणजे नाचणी आंबळी, जी चवीला स्वादिष्ट आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.

उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासह पचनक्रिया राहील चांगली, फक्त आहारात समावेश करा नाचणीची आंबील, जाणून घ्या सोपी रेसिपी
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 14, 2026 | 12:10 PM
Share

उन्हाळा सुरू होताच आपल्या प्रत्येकाच घरांमध्ये असे अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात जे आपल्या शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतात. असाच एक पदार्थ म्हणजे नाचणीची आंबील. जी उन्हाळ्यातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. नाचणी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे नाचणीची आंबीलचे सेवन करणे खूप पौष्टिक असते. ज्यामुळे ते तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते. चला तर मग आजच्या लेखात आपण नाचणीची आंबील कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेऊयात.

नाचणीचे पीठ शिजवून, ते आंबवून आणि नंतर ताकात मिसळून नाचणी आंबळी बनवली जाते. ते अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी त्यात सौम्य मसाले आणि हर्ब्स देखील मिक्स केले जातात. तसेच या आंबील मध्ये कांदे आणि हिरव्या मिरच्याही टाकल्या जातात, ज्यामुळे या अंबीलचे सेवन केल्याने उष्माघातापासून संरक्षण होते.

नाचणीची आंबील बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप नाचणी, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या (याही बारीक चिरलेल्या/चवीनुसार कमी-जास्त घालू शकता), थोडी चिरलेली कोथिंबीर, 8-10 कढीपत्ता, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, नाचणी शिजवण्यासाठी 3 ते 3.5 कप पाणी लागेल.

नाचणीची आंबील कशी बनवायची?

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात नाचणीच्या पिठात 2 कप पाणी टाका आणि मिश्रण चांगले मिक्स करा. पातळ पेस्ट तयार करा. सोबतच पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.

आता गॅसवर एक पातेले ठेवा आणि त्यात 1 ते 1.5 कप पाणी टाका. नंतर त्या पातेल्यात विरघळवलेले नाचणीचे पीठ टटाका.

हे मिश्रण सतत ढवळत शिजवा. जेव्हा ते थोडे घट्ट होईल, म्हणजेच त्याला मलईदार पोत येईल तेव्हा गॅस बंद करा.

आता एका मातीच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात तयार केलेले नाचणीचे मिश्रण टाक आणि या मातीच्या भांड्यावर झाकून ठेवा आणि रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा.

सकाळी नाचणी हाताने चांगली कुस्करून त्याच पाण्यात मिसळा.

आता या मिश्रणात ताक मिक्स करा. तसेच इच्छित असल्यास तुम्ही या मिश्रणात फेटलेले दही देखील मिक्स करूशकता. पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.

आता यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाका. यामुळे चव आणि पोषक तत्वांचे मिश्रण तयार होते.

मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड मिक्स करून चांगले मिसळा आणि चिरलेल्या कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

नाचणीतील पोषक तत्वे

नाचणीची आंबील ही आंबवली असते, ज्यामुळे गूड बॅक्टेरिया वाढण्यास वाव मिळतो. जे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचनक्रियेस मदत करतात. ताक देखील एक प्रोबायोटिक अन्न आहे. पबमेडनुसार नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि फिनोलिक संयुगे चांगल्या प्रमाणात असतात. अनेक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे मधुमेहींसाठी हे एक फायदेशीर धान्य मानले जाते. हे वजन नियंत्रणातही उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त हे तुमच्या आरोग्यासाठी इतर अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!.
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक...
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक....
एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतील
एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतील.
अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा
अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा.
त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या...
त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या....