AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात करा शेवग्याचा समावेश, जाणून घ्या याचे लाभदायी गुण

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी समृद्ध भाज्या आणि फळांचा समावेश करण्याची शिफारस केली जाते. अशीच एक चमत्कारीक वनस्पती म्हणजे शेवगा. (Include moringa in your diet to fight covid-19, know its benefits)

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात करा शेवग्याचा समावेश, जाणून घ्या याचे लाभदायी गुण
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात करा शेवग्याचा समावेश, जाणून घ्या याचे लाभदायी गुण
| Edited By: | Updated on: May 18, 2021 | 7:22 AM
Share

मुंबई : भारतातील कोविड-19 ची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रोगांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण सावधगिरीच्या उपायांनी स्वतःचा बचाव केला पाहिजे. यासह, आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावरही अधिक भर दिला पाहिजे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी समृद्ध भाज्या आणि फळांचा समावेश करण्याची शिफारस केली जाते. अशीच एक चमत्कारीक वनस्पती म्हणजे शेवगा. हे भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाते आणि घरी सहजपणे लागवड करता येते. आपण आपल्या आहारात शेवगा समाविष्ट करू शकता किंवा पूरक म्हणून त्याचे कॅप्सूल घेऊ शकता. (Include moringa in your diet to fight covid-19, know its benefits)

हे एक प्रभावी अँटिऑक्सिडेंट आहे

शरीरातील मुक्त रॅडिकल्स रोगप्रतिकारक शक्तीसाठी धोकादायक असतात. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स स्वच्छ करण्यात आणि कॅन्सर रोखण्यास मदत करतात. या वनस्पतीने ओळखले जाणारे फायटोकेमिकल्स SARS-CoV-2 विषाणूस प्रतिबंधित करू शकतात. हे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते आणि एक उत्कृष्ट अँटी-एजिंग एजंट म्हणून कार्य करते. याव्यतिरिक्त, शेवगा लोह आणि व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे. यात रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य वाढवणारी पौष्टिक जीवनसत्वे असतात.

हे अँटी इंफ्लेमेटरी आहे

कोव्हीड-19 विषाणूमुळे श्वसन ग्रंथींमध्ये सूज येते. शेवग्याच्या नियमित वापरामुळे ही सूज रोखता येते कारण ही वनस्पती अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हेच कारण आहे की शेवग्याचा नियमित वापर करून संधिवात देखील टाळता येऊ शकतो.

व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत

अलिकडेच, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये आणि विषाणूशी लढण्यासाठी काम करण्यामध्ये व्हिटॅमिन सी वर जोर देण्यात आला आहे. शेवग्यामध्ये जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात आहे. एक कप ताज्या चिरलेल्या शेंगा (100 ग्रॅम) मध्ये आपल्या रोजच्या सी जीवनसत्वाच्या गरजेच्या 157 टक्के भाग असतो. म्हणूनच, या झाडाची पाने किंवा फळांचे सेवन आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले जावे.

अनेक पोषक तत्वांनी आहे समृद्ध

कोविडचा संसर्ग झालेल्या लोकांना रिकव्हर होण्यासाठी शेवग्याचा कोणताही भाग पाने, फळे किंवा बिया फायदेशीर आहेत. ही वनस्पती व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, लोह, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे. ही पोषक तत्वे विषाणूशी लढा देत कमजोरी आणि थकवा दूर करुन ताकद परत मिळविण्यात मदत करतात. (Include moringa in your diet to fight covid-19, know its benefits)

इतर बातम्या

Video | महिलेला ‘पोल डान्स’ची भारीच हौस, मध्येच ‘असं’ घडलं की व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती, तर उपमुख्यमंत्र्यांची फक्त बारामतीपुरती, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.