AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चला परदेशात फिरायला, IRCTC चे स्वस्त टूर प्लॅन्स जाणून घ्या

परदेशात फिरायला जायचं आहे का? मग ही बातमी वाचा. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आता प्रवाशांना रेल्वे तसेच हवाई मार्गाने परदेशात जाण्याची संधी देण्यास सुरुवात केली आहे.

चला परदेशात फिरायला, IRCTC चे स्वस्त टूर प्लॅन्स जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Apr 25, 2025 | 2:38 PM
Share

IRCTC International Tour Package: तुम्ही फक्त बॅग भरा आणि परदेशात जाण्याची तयारी करा. कारण, आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आता प्रवाशांना रेल्वे तसेच हवाई मार्गाने परदेशात जाण्याची संधी दिली आहे. यासाठी आकर्षक पॅकेजस आहेत, चला तर मग जाणून घेऊया.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आता प्रवाशांना रेल्वे तसेच विमानाने परदेशात जाण्याची संधी देण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे.

IRCTC ने उन्हाळ्यासाठी खास इंटरनॅशनल टूर पॅकेज लाँच केले आहे, जे मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी खास डिझाइन करण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला अत्यंत माफक दरात परदेशात जाण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी असल्याचा दावा केला जात आहे. या पॅकेजमध्ये विमान तिकिटांबरोबरच परदेश प्रवासाचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे.

लंडन टूरसह युरोपचा समावेश

आता तुम्ही IRCTC च्या माध्यमातून बुकिंग करून परदेशातील अनोख्या पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. प्रवाशांना कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये, अशा पद्धतीने IRCTC ने ही पॅकेजेस डिझाइन केली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात IRCTC ने काही प्रमुख आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजेसची घोषणा केली आहे. यामध्ये लंडन टूरसह युरोपचा समावेश आहे.

या पॅकेजच्या माध्यमातून प्रवासी लंडन आणि युरोपातील इतर प्रमुख शहरांना भेट देऊ शकतात. याशिवाय दुबई पॅकेज, सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटन प्रेमींसाठी नेपाळ टूर आणि श्रीलंका रामायण टूर देखील सुरू करण्यात आली आहे.

परदेशी टूर पॅकेजेस

थायलंड: 3 रात्र/4 दिवसांसाठी 47,580 रुपयांचे पॅकेज. दक्षिण कोरिया: 7 रात्री/8 दिवसांसाठी 2,15,000 रुपयांचे पॅकेज. श्रीलंका: 6 रात्र/7 दिवसांसाठी 65,000 रुपयांचे पॅकेज. युरोप डिस्नेलँड: 4,12,400 रुपयांचे 14 रात्री/15 दिवसांचे पॅकेज पॅरिस: 3,76,500 रुपयांचे 12 रात्री/13 दिवसांचे पॅकेज नेपाळ: 62,100 रुपयांचे 5 रात्री/6 दिवसांचे पॅकेज. भूतान: 66,900 रुपयांचे 5 रात्री/6 दिवसांचे पॅकेज सिंगापूर-मलेशिया: 1,17,260 रुपयांचे 8 रात्री/9 दिवसांचे पॅकेज दुबई: 94,785 रुपयांचे 5 रात्री/6 दिवसांचे पॅकेज (स्त्रोत: IRCTC चे अधिकृत संकेतस्थळ)

IRCTC ने मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी स्वस्त प्रवास सुरू केला IRCTC ने मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी स्पर्धात्मक किंमतीत आंतरराष्ट्रीय प्रवास पॅकेज ऑफर केले आहेत. या पॅकेजअंतर्गत प्रवाशांना प्रवासाचा सर्वांगीण अनुभव मिळणार आहे, ज्यात निवास, भोजन आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांच्या तुलनेत ही पॅकेजेस परवडणारी असल्याने अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ घेता येतो. बुकिंगसाठी प्रवासी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या काउंटरवर संपर्क साधू शकतात.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण