AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाताच्या अंतरात दडलेली तुमचं भविष्य, वाचा उत्कंठावर्धक माहिती

शरीराच्या रचनेला मनुष्याच्या जीवनाशी जोडणाऱ्या अनेक गोष्टी समुद्रशास्त्रामध्ये सांगितल्या आहेत. दातांमधील अंतर, ज्याला आपण सौंदर्यातील डाग समजता समुद्रशास्त्रात त्याबद्दल खूपच मनोरंजक गोष्टी सांगितल्या आहेत.

दाताच्या अंतरात दडलेली तुमचं भविष्य, वाचा उत्कंठावर्धक माहिती
teeth
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 10:47 AM
Share

मुंबई : सुंदर दिसण्यासाठी लोक अनेक गोष्टी करत असतात. फेशियल, हेअर स्पा पम या सर्वामध्ये ते आपल्या दातांकडेही लक्ष देत आहेत. दातांच्या बाबतीत दात साफ करणे आणि ब्लीचिंगची प्रथा वाढली आहे.अनेक ज्योतिषी लोकांचे केवळ चेहरे बघून आपल्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. एखाद्याचे विस्तृत कपाळ आणि पुढच्या दातातील अंतर पाहून ते त्याला भाग्यवान सांगतात. परंतु सर्वच लोक असे सांगत नाहीत. शरीराच्या रचनेला मनुष्याच्या जीवनाशी जोडणाऱ्या अनेक गोष्टी समुद्रशास्त्रामध्ये सांगितल्या आहेत. दातांमधील अंतर, ज्याला आपण सौंदर्यातील डाग समजता समुद्रशास्त्रात त्याबद्दल खूपच मनोरंजक गोष्टी सांगितल्या आहेत. (What does the gap in your teeth indicate, know interesting information)

समुद्रशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या दातांमध्ये अंतर असते, ते खूप जाणकार असतात. असे लोक आश्चर्यकारक प्रतिभेने समृद्ध असल्याने, हे लोक जीवनात खूप यशस्वी आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे आणि सोपे असते. आणि असे लोक इतरांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात.

  • जर नोकरदार लोकांच्या दातांमध्ये अंतर असेल तर हे सूचित करते की हे लोक त्यांच्या करिअर क्षेत्रात काही मोठे यश मिळवतील. ज्या लोकांच्या पुढच्या दातांमध्ये थोडे अंतर असते, ते सकारात्मक ऊर्जाने भरलेले असतात. असे लोक कोणतेही काम मोठ्या उत्साहाने करतात आणि ते खूप भाग्यवान देखील असतात.
  • दातांमध्ये अंतर आसणारे लोक खूपच सकारात्मक असतात. ते खूप आनंदी जीवन जगतात.
  • ज्या लोकांचे दात सारख्या मापाचे असतात, आणि मोत्यांसारखे चमदार असतात ते खूपच भाग्यशाली असतात.
  • ज्यांच्या पुढच्या दातांमध्ये अंतर आहे, ते खूप मनमिळावू लोक असतात. जर तुम्हाला जीवनात कोणत्याही कार्यात यश मिळत नसेल तर सहजपणे हार मानू नका. अशा प्रकारे, अडचणीच्या दिवसात घाबरून जाऊ नका पण धीराने त्याचा सामना करा.
  • हे लोक आपल्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेतात आणि कोणत्याही अडचणीशिवाय आरामात आपले जीवन जगणे पसंत करतात.
  • हे लोक खुल्या विचारांचे असतात. या लोकांना संसारीक गोष्टी समजत नाहीत. हे लोक वेळेसह पुढे जाण्याचा विचार करतात जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये.
  • ज्या लोकांच्या दातात गॅप असतो, ती व्यक्ती ज्याच्याशी लग्न करते त्यांचे आयुष्य चांगले होते. त्यांच्या नशिबामुळे, त्यांच्या जोडीदाराच्या आयुष्यातही बरेच बदल होतात. असे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि प्रत्येक प्रकारे त्यांना आनंदी ठेवतात. त्यांचे प्रेम खूप शुद्ध असते आणि प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग खूप वेगळा असतो.
  • या लोकांना उर्जेचे भांडार म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. हे लोक जिथे जातात तिथे तिथे उत्तम स्थान मिळवतात आणि इतरांना त्यांच्या गुणांनी प्रभावित करतात. हे लोक चांगले खेळाडू असतात.या लोकांना खाण्यापिण्याची खूप आवड असते, पण त्यांना स्वयंपाक बनवणेही तितकाच आवडतो. म्हणूनच त्यांच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते.

इतर बातम्या:

Coconut Smoothie Recipe : नाश्त्यामध्ये ‘या’ क्रीमयुक्त कोकोनट स्मूदीचा समावेश करा ! 

Skin Care Tips : ‘हे’ हर्बल फेसपॅक वापरा आणि चमकदार त्वचा मिळवा!

Health Tips :सणासुदीच्या काळात शरीराला ‘या’ खास प्रकारे डिटॉक्स करा! 

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.