स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस की तुमची एनिवर्सरी, आम्ही करणार तुमची डेट खास

स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस की तुमची एनिवर्सरी, आम्ही करणार तुमची डेट खास

वाढदिवस असो किंवा एनिवर्सरी हा दिवस तुमच्यासाठी खूप खास असतो. हा दिवस स्पेशल करण्यासाठी आपण अनेकवेळा बाहेर जेवायला जातो. मग प्रश्न पडतो की कुठे जाऊ शकतो कुठल्या हॉटेलची निवड करायला हवी, जिथे तुमचा दिवस स्पेशल होईल, जेवणही टेस्टी असेल? मग यासाठी आम्ही करणार तुम्हाला मदत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 17, 2021 | 7:04 AM

मुंबई :  मुंबईत अनेक हॉटेल आहेत. पण कुठल्या हॉटेलमध्ये गेल्यास आपली डेट कायमची आठवणीत राहिल. त्यासाठी मुंबईतील 6 कॅफेबद्दल आम्ही सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमच्या खास व्यक्तीचा वाढदिवस, एनिवर्सरी साजरी करु शकता. चला तर पाहूयात मुंबईतील सर्वोत्तम कॅफे

लोटस कॅफे

जेडब्ल्यू मॅरियटमधील लोटल कॅफे अतिशय शानदार आहे. याठिकाणी इटालियन, कॉन्टिनेंटल, नॉर्थ इंडियन अशा विविध प्रकारच्या व्हरायटीज मिळतात. या हॉटेलचं इंटीरियर दिलखुश करुन टाकतं.

ग्रँडमा कॅफे

हा कॅफे तरुणांना खूप आकर्षित करतो. याची खासियत म्हणजे तुम्हाला इथे वॉलेट पार्किंगची सोय उपलब्ध आहे, मोफत वायफाय सेवाही मिळते,  इथेही तुम्हाला सगळ्यात बेस्ट आणि टेस्टी मेन्यू  मिळतात, या कॅफेची डिझाइन सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.

काळा घोडा कॅफे

इथे तुम्ही तुमचा दिवस खास करु शकता. अगदी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी पण हा कॅफे मस्त आहे. या कॅफेमधील शांतता आपल्या रोजच्या जीवनातील धावपळीनंतर हवीहवीशी वाटते. या कॅफेमध्ये देखील मोफत वायफायची सुविधा देण्यात आली आहे.

सामवेने

हे मुंबईतील सर्वात क्लासिक कॅफे असून तुमच्या खिशाला परवडेल असा आहे. या कॅफेचा इन्स्टा फ्रेंडली लूक तुम्हाला त्याचा प्रेमात पाडतं. जर तुम्ही फोटोप्रेमी असाल तर इथे  काही हटके फोटो तुम्हाला मिळू शकतील.

पृथ्वी कॅफे

तुम्ही रोमँटिक डेट किंवा हँग आऊटसाठी जागा शोधत आहात तर जुहूमधील पृथ्वी कॅफे बेस्ट आहे.

गार्डन मंगर कॅफे

हा विलेपार्लेमधील एकदम शानदार कॅफे आहे. याची  एक खासियत आहे, ती म्हणजे  हा कॅफेचा एन्वायरमेंट आपल्याला रिफ्रेश करतो. याठिकाणी दोघांसाठी बजेट साधारण 650 रुपयांपर्यंत जाईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें