टोमॅटो केचपचा आहारातील अतिरिक्त वापर टाळाच, जाणून घ्या महत्वाची माहीती!

टोमॅटो सॉस म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. टोमॅटो सॉस किंवा केचप पिझ्झापासून परोट्यापर्यंत जवळपास सर्वच खाद्यपदार्थांसोबत खाल्ले जाते. बऱ्याच वेळा आपण चिली चिकनमध्ये टोमॅटो सॉसऐवजी टोमॅटो केचप वापरतो. मात्र, असे करणे पूर्णपणे टाळा.

टोमॅटो केचपचा आहारातील अतिरिक्त वापर टाळाच, जाणून घ्या महत्वाची माहीती!
टोमॅटो केचप

मुंबई : टोमॅटो सॉस म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. टोमॅटो सॉस किंवा केचप पिझ्झापासून परोट्यापर्यंत जवळपास सर्वच खाद्यपदार्थांसोबत खाल्ले जाते. बऱ्याच वेळा आपण चिली चिकनमध्ये टोमॅटो सॉसऐवजी टोमॅटो केचप वापरतो. मात्र, असे करणे पूर्णपणे टाळा. जास्त प्रमाणात फ्रक्टोज कॉर्न सिरप खाल्ल्याने लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स, हाय ट्रायग्लिसराइड्स आणि फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढतो. आपल्या आहारात केचप समाविष्ट करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

-पौष्टिक आहारामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत होते. तर केचपमध्ये पोषक तत्वे कमी असतात आणि प्रथिने आणि फायबर कमी असतात. फ्रक्टोज कॉर्न सिरपचे जास्त सेवन केल्याने उच्च ट्रायग्लिसराइड्स आणि अनेक हृदय समस्या होऊ शकतात.

-टोमॅटो केचप हे आम्लयुक्त अन्न आहे. त्यात मॅलिक अॅसिड आणि सायट्रिक अॅसिड सारखी अॅसिड असते. त्यामुळे शरीरात अॅसिडिटी, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे ज्यांना अपचन किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीजसारख्या पचनाच्या समस्या आहेत त्यांनी टोमॅटो केचप टाळावे. प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे जळजळ होण्याचा धोका जास्त असतो.

-केचपमधील टोमॅटोमध्ये भरपूर हिस्टामाइन असते. त्यामुळे शिंका येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या केचपचा तुमच्या शरीरावर किती परिणाम होतो हे तुम्हाला समजेल. त्यामुळे टोमॅटो केचप टाळण्याचा प्रयत्न करा. टोमॅटो केचपऐवजी आपण आपल्या आहारामध्ये टोमॅटोचा समावेश करायला हवा.

टोमॅटोचे फायदे

टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.

(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Health Tips : हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा, वाचा अधिक !

अॅसिड रिफ्लक्स ही काही किरकोळ गॅस समस्या नाही, ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका


Published On - 10:09 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI