ख्रिसमसची लगबग, टीव्ही9 कडून ख्रिसमसचं खास गिफ्ट, घरच्या घरी बनवा खास ड्रायफ्रूट केक

ख्रिसमस जवळ येत आहे. बाजारपेठ्या ख्रिसमस ट्री आणि रंगीबेरंगी वस्तूने सजलं आहे. ख्रिसमस म्हटलं की लहान मुलांना आवडतो तो म्हणजे सांता. कारण तो आपल्यासाठी गिफ्ट आणतो. आणि दुसरी गोष्ट आठवते ती म्हणजे केक. ख्रिसमसनिमित्त ख्रिश्चन घरात आवर्जून केक बनवले जाता. आजकाल मार्केटमध्येही विविधी प्रकारचे आकर्षक केक उपलब्ध आहेत. मात्र घरच्या केकची गोडी काही औरच असते. आपण सोप्या पद्धतीने घरीदेखील केक बनवू शकतो. बच्चे कंपनी आणि मोठ्यांना आवडेल असा ड्रायफ्रूट केक बनवणार आहोत.

ख्रिसमसची लगबग, टीव्ही9 कडून ख्रिसमसचं खास गिफ्ट, घरच्या घरी बनवा खास ड्रायफ्रूट केक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 1:45 PM

ख्रिसमसमध्ये केक बनवण्याची परंपरा आहे. डिसेंबर महिना सुरु झाला की ख्रिश्चन बांधवांनच्या घरात ख्रिसमसची सजावट सोबतच लगबग सुरु असते ती केक बनवण्याची. दिवाळीत आपल्याकडे फराळाला जसं महत्त्व असतं तसंच ख्रिसमसमध्ये केकला महत्त्व असतं. या घरांमध्ये विविध प्रकारचे केक बनवले जातात. आपल्यालाही हे बनवता यावे यासाठी आम्ही आज तुम्हाला एक स्पेशल केकची सोपी पद्धत सांगणार आहोत. दिवाळी झाली त्यामुळे घरामध्ये ड्रायफ्रूट मोठ्या प्रमाणात असतील तसंच हिवाळा सुरु झाल्यामुळे आपण ड्रायफ्रूट खाण्यावर भर देतो. कारण यामुळे हिवाळ्यात आपल्याला शरीराला उष्णता मिळते. म्हणून आपण पाहूयात ड्रायफ्रूट केकची रेसिपी

ड्रायफ्रूट केक (Dry Fruit Cake) साहित्य मैदा – 2 कप बेकिंग पावडर – 1 टेस्पून जायफळ पावडर – 2 डॅश अंडी – 2 व्हॅनिला अर्क – 1 टेस्पून आवश्यकतेनुसार उकळलेले पाणी मिक्स ड्रायफ्रूट्स- 1 1/4 कप साखर – 3/4 कप बटर – 1/2 कप दूध – 3/4 कप सॉर क्रीम – 1/2 कप कृती स्टेप-1 ड्राय फ्रूट्सला उकळत्या पाण्यात साधारण 15-20 मिनिटं भिजवा आणि नंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. स्टेप- 2 – बेकिंग पॅनला फॉइल लावा आणि ओव्हन 180 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करा स्टेप – 3 एका काचेच्या बाऊलमध्ये अंडी फोडा. त्यात दूध, सॉर क्रीम, मेल्टेड बटर, व्हॅनिला अर्क घालून मिश्रण चांगले फेटून घ्या. स्टेप – 4 दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा, जायफळ पावडर, मीठ, साखर आणि बेकिंग पावडर चांगली मिसळून घ्या. स्टेप 5 – आता कोरडे मिश्रण काचेच्या बाऊलमधील मिश्रणात चांगल्या प्रकारे मिक्स करा. या मिक्समध्ये आता ड्रायफ्रूट टाका.

स्टेप – 6 फॉइलने झाकलेले पॅनमध्ये हे केकचे मिश्रण टाका आणि केक 25-30 मिनिटे बेक करा. केक शिजला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही टूथपिकचा वापर करु शकता. स्टेप – 7 आता केक थंड झाल्यावर चॉकलेट सिरप किंवा आपल्या आवडीच्या फ्रॉस्टिंगने सजवा. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला जाताना हा घरी बनवलेला केक घेऊन जा आणि ख्रिसमस पार्टीमध्ये धमाल करा.

Omicron : मराठवाडा, विदर्भात ओमिक्रॉनचा फैलाव वाढला, उस्मानाबाद, बुलडाण्यात नवे रुग्ण

Bullock cart race| बैलगाडा शर्यतीबाबत उद्या सकारात्मक निकाल लागेल अशी आशा- आमदार महेश लांडगे

Video | Shocking | Tragedy | गळफास घेण्याची एक्टिंग करताना स्टूलवरुन पडला आणि…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.