संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे 6 राज्यांचा घेवर, श्रावणात नक्की चाखा याचा स्वाद…
श्रावणात घेवर खाण्याची परंपरा अनेक राज्यांमध्ये उत्साहात पाळली जाते. या 6 राज्यांचा खास घेवर आता देशाबाहेरही प्रसिद्ध झाला आहे. पारंपरिक चवेसोबतच तो आता अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्समध्येही उपलब्ध आहे. चला तर मग, फक्त एका क्लिकवर जाणून घेऊया या घेवरची संपूर्ण खासियत.

श्रावण महिना म्हणजेच पावसाळ्याचा उत्साही काळ. याच महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल असते आणि खवय्यांसाठी ही वेळ खास असते. याच पार्श्वभूमीवर एक पारंपरिक, गोडसर आणि खवखवीत मिठाई लोकांच्या जिभेवर झणझणीत अधिराज्य गाजवते ती म्हणजे घेवर. ही खास मिठाई आता भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झाली आहे. घेवर ही केवळ मिठाई नसून अनेकांसाठी ती परंपरेचा आणि सणाचा अविभाज्य भाग बनली आहे.
गोलसर, जाळीदार आकाराचा आणि वरून रबडी, केशर किंवा ड्रायफ्रूट्सने सजवलेला घेवर श्रावणात खाण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. विशेषतः तीज आणि रक्षाबंधनसारख्या सणांमध्ये तर याला विशेष महत्त्व असतं. पारंपरिकपणे राजस्थानची ही मिठाई मानली जाते, पण आजघडीला घेवर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि बिहारमध्येही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.
घेवरची प्रसिद्ध ठिकाणं:
1. राजस्थान:
राजस्थानचा घेवर म्हणजे स्वाद आणि परंपरेचं अद्वितीय मिश्रण. जयपूरचा घेवर तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जातो. घेवर बनवण्याची सुरुवात शाही दरबारांपासून झाली होती. आजही परदेशी पर्यटक जयपूरला आले की घेवर खाल्ल्याशिवाय परत जात नाहीत.
2. दिल्ली:
दिल्लीतील चांदणी चौक, बंगाली मार्केट आणि बंगला साहिब रोड ही घेवरप्रेमींसाठी खास ठिकाणं आहेत. इथला घेवर खास दिल्ली स्टाइलमध्ये तयार होतो आणि त्याचा स्वाद अविस्मरणीय असतो.
3. हरियाणा:
पानीपत आणि समालखा हे ठिकाण घेवरसाठी प्रसिद्ध झाले आहेत. इथला घेवर इतका लोकप्रिय आहे की देशविदेशातून लोक फक्त त्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे येतात.
4. उत्तर प्रदेश:
यूपी तर चविष्ट खाण्याच्या बाबतीत आधीपासूनच प्रसिद्ध आहे. बागपत जिल्ह्याचा घेवर तर विशेष मानला जातो. लोक इथे घेवरसाठी विशेषतः श्रावणात गर्दी करतात.
5. गुजरात आणि मध्य प्रदेश:
इथंही घेवरची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. मोठ्या शहरांतील मिठाईच्या दुकानांमध्ये श्रावणात घेवरची खास विक्री होते.
6. बिहार:
बिहारमधील काही भागांतही घेवर आता लोकप्रिय झाला आहे. विशेषतः तीजसारख्या सणांमध्ये घेवरचा स्वाद अनिवार्य मानला जातो.
घेवरचे वेगवेगळे प्रकार
1. गोड घेवर
2. फीकट घेवर
3. मावा घेवर
4. सादा घेवर
5. चॉकलेट घेवर
6. केसर घेवर
7. स्ट्रॉबेरी घेवर
8. कीवी घेवर
श्रावणात पथ्य आणि आहाराचं महत्त्व जरी असलं तरी घेवरसारख्या पारंपरिक मिठाईने सणाचा आनंद द्विगुणित होतो. भारताच्या विविध राज्यांतून आपल्या खास रंगरूपात साकारलेला घेवर हे दर्शवतो की आपली खाद्यसंस्कृती किती विविधतांनी भरलेली आणि एकमेकांना जोडणारी आहे. यंदा श्रावणात तुम्हीही या मिठाईचा स्वाद नक्की घ्या.
