निरोगी आयुष्य जगण्यासाठी दररोज सकाळी ‘या’ 7 गोष्टी करा, जाणून घ्या याबद्दल अधिक!

पावसाळ्याच्या हंगामात वातावरणात थंड असते. यामुळे सकाळी उठणे थोडे कठीण जाते. मात्र, हंगाम कोणताही असो दररोज सकाळी उठून व्यायाम करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी दररोज सकाळी 'या' 7 गोष्टी करा, जाणून घ्या याबद्दल अधिक!
आरोग्य

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात वातावरण थंड असते. यामुळे सकाळी उठणे थोडे कठीण जाते. मात्र, हंगाम कोणताही असो दररोज सकाळी उठून व्यायाम करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत. तसेच कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण दररोज कमीत-कमी 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. (Follow these 7 things every morning to live a healthy life)

पानी प्या

निरोगी राहण्यासाठी पानी पिणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण दररोज सकाळी झोपीतून उठल्यानंतर कमीतकमी एक ग्लास पाणी पिले पाहिजे. आपल्या शरीराची सर्व अवयव आणि ऊती पाण्यावर अवलंबून असतात. झोपेतून उठल्यावर पाणी पिल्याने दिवसभर शारीरिक कार्य सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. शक्यतो घरच्या बाहेर पडताना आपण पाण्याची बाॅटलच घेऊन जावे.

एक किलो मीटर पळा

सकाळी झोपेतून लवकर उठा आणि साधारण एक किलो मीटर तरी पळा. यामुळे आपले स्नायू मजबूत होतात. दररोज सकाळी धावणे, सायकलिंग करणे किंवा जॉगिंग करणे. यामुळे हृदयविकाराचा झटका, हृदयरोग आणि अल्झाइमर यांचा धोका कमी होतो. यामुळे दररोज सकाली लवकर उठा आणि कोणताही व्यायाम करा.

स्ट्रेस कमी करा

योगा आणि ध्यान धारणा आपल्याला तणावमुक्त राहण्यासा मदत करते. दिवसातून किमान अर्ध्या तासांसाठी योगा करा. योगा केल्याने आपले मन शांत राहते आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते. आपल्या आवडत्या गोष्टी करा. व्हिडीओ कॉल किंवा फोन करून आपल्या परिवाराशी आणि मित्रांशी गप्पा मारा.

रात्री साऊंड स्लिप घ्या, ताण घेऊ नका

कोर्टिसोल एक स्ट्रेस हार्मोन आहे. हायकोर्टिसोलची पातळी वाढली तर ब्लड शुगरची पातळी धोकादायक बनते. रात्री साऊंड स्लिप घ्या. कमीत कमी 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर योगा करून तणावमुक्त राहा. तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये मन व्यस्त ठेवा.

चेहऱ्याचा मसाज

दररोज सकाळी उठल्यावर अगोदर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. आपला चेहरा स्वच्छ करणे हे आपल्या दात घासण्याइतकेच महत्वाचे आहे. चांगल्या आणि सुंदर त्वचेसाठी आपण दररोज सकाळी चेहऱ्या धुतल्यानंतर एक पाच मिनिटांसाठी चेहऱ्याचा मसाज करा.

सनस्क्रीन लावा

हंगाम कोणताही असतो मात्र, सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. सनस्क्रीन आपला चेहरा हानिकारक किरणोत्सर्गापासून वाचवते आणि यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म देखील आहेत जे आपल्या त्वचेचे क्षय रोखण्यास आणि डाग आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात.

संतुलित आहाराचे पालन करा

दररोज संतुलित आहार ठेवा. आहारात पुरेशी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. जेवणासोबत सलाड किंवा सूप घ्या. त्यामुळे ग्लूकोजची पातळी कंट्रोलमध्ये राहील तसेच इंसुलिन रेसिस्टेंस रोखण्यास मदत होईल. दिवसातून जर तुम्ही 5 वेळ जेवण करत असाल, तर कमीत कमी एकदा सलाड आणि फळे खा. ताजी फळे अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेली असतात. त्यामुळे पुरेशी ताजी फळे खा.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

(Follow these 7 things every morning to live a healthy life)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI