हिवाळ्यात बनवा ‘हा’ आरोग्यदायी लसूण सूप, जाणून घ्या खास रेसिपी! 

हिवाळा जवळ आला आहे आणि सूप हे आरामदायी अन्न आहे जे तुम्हाला आतून उबदार ठेवते. टोमॅटो सूप, स्वीट कॉर्न सूप, मिक्स्ड व्हेज सूप, कोबी सूप इत्यादी अनेक प्रकारचे सूप तुम्ही ट्राय केले असतील, पण तुम्ही कधी लसूण सूप खाल्ले आहे का?

हिवाळ्यात बनवा 'हा' आरोग्यदायी लसूण सूप, जाणून घ्या खास रेसिपी! 
सूप

मुंबई : हिवाळा जवळ आला आहे आणि सूप हे आरामदायी अन्न आहे जे तुम्हाला आतून उबदार ठेवते. टोमॅटो सूप, स्वीट कॉर्न सूप, मिक्स्ड व्हेज सूप, कोबी सूप इत्यादी अनेक प्रकारचे सूप तुम्ही ट्राय केले असतील. पण तुम्ही कधी लसूण सूप खाल्ले आहे का? हा खास सूप तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त लसूण, कांदा, बटाटा, ताजी मलई, जिरे, थाईम, चिली फ्लेक्स आणि मीठ यांसारखे काही घटक लागतील. सूप अधिक पौष्टिक बनवण्यासाठी, तुम्ही भाज्या मिक्स आणि मॅच करू शकता आणि काही अतिरिक्त घटक जसे की आले, पालक इत्यादी घालू शकता.

लसूणच्या सूपचे साहित्य

8 पाकळ्या लसूण

1 बटाटा

1/2 टीस्पून जिरे

1 टीस्पून चिली फ्लेक्स

2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल

1 कांदा

1/2 कप फ्रेश क्रीम

1 टीस्पून अजवाईन

आवश्यकतेनुसार मीठ

लसूण सूप कसा बनवायचा

स्टेप 1-

एका मोठ्या भांड्यात ऑलिव्ह ऑईल गरम करा. जिरे टाका आणि आता चिरलेला कांदा घालून एक मिनिट परतून घ्या. बारीक चिरलेला लसूण घालून आणखी एक मिनिट परतून घ्या.

स्टेप 2-

आता चिरलेला बटाटा 1-2 कप पाण्याबरोबर घाला. चवीनुसार मीठ टाका, भांडे झाकण ठेवून 15-20 मिनिटे शिजू द्या.

स्टेप 3-

आता सूपमध्ये फ्रेश क्रीम घाला आणि इतर घटकांसह चांगले मिसळा. दोन मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.

स्टेप 4-

आता ब्लेंडरच्या मदतीने चांगली पेस्ट तयार करून घ्या

स्टेप 5-

आता ब्लेंडरमधून सूप पॅनमध्ये काढा. आता चवीनुसार पाणी घालून ढवळत राहा.

स्टेप 6-

सूप एका वाडग्यात काढा, ओरेगॅनो, चिली फ्लेक्सने सजवा आणि सर्व्ह करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Garlic soup is extremely beneficial for health)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI