AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि रोगांना दूर ठेवा!

कोरोनापासून प्रत्येकजण आपल्या आरोग्याच्या (Health) बाबतीमध्ये सर्तक आहे. जवळपास सर्वांनाच रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? आणि ती कशी वाढवायची हे समजले आहे. यामुळे जवळजवळ प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचे पालन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Health : आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि रोगांना दूर ठेवा!
निरोगी आहार घ्या आणि हेल्दी जीवन जगाImage Credit source: helpguide
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 10:38 AM
Share

मुंबई : कोरोनापासून प्रत्येकजण आपल्या आरोग्याच्या (Health) बाबतीमध्ये सर्तक आहे. जवळपास सर्वांनाच रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? आणि ती कशी वाढवायची हे समजले आहे. यामुळे जवळजवळ प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचे पालन करण्याचा प्रयत्न करीत आहे. सकस आहार, उच्च प्रथिन्यांचे (Protein) सेवन, कमी कार्बोहायड्रेट सेवन, जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात घेणे आणि पाण्याचे जास्त सेवन यांचा समावेश होतो. वेळेवर खाणे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे महत्वाचे आहे. अन्नाचा (Food) आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

हृदयविकार

जर आपले वजन व्यवस्थित असेल तर आपल्यापासून आजारही दूर राहतात. दरवर्षी जगभरात मोठ्या संख्येने लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब याही समस्या आहेत. हे सर्व आजार रोखण्यासाठी आहाराची भूमिका महत्वाची आहे. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या वाढत आहे. जसजसा रक्तदाब वाढतो, तसतसे अधिक समस्या निर्माण होतात.

अँटिऑक्सिडंट्स पदार्थ

निरोगी राहायचे असेल तर वेळेवर अन्न खाणे आवश्यक आहे. फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर असते. तसेच फक्त आहाराच नाहीतर तणाव कमी करणे आवश्यक आहे. अतिरिक्त मीठ आणि साखर देखील टाळली पाहिजे. अँटिऑक्सिडंट्स असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खावेत. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

हंगामी फळे आणि भाज्या

हंगामी फळे, हिरव्या भाज्या, लिंबू, यातील प्रत्येक पदार्थात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे या सर्व पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करावा. हे पदार्थ कर्करोगापासून बचाव करण्यासही मदत करतात. फळे आणि भाज्यांमधील ग्लायसेमिक इंडेक्स असते, यामुळे तुमच्या रोजच्या आहारात ठेवा.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी जास्त खाण्याचा प्रयत्न करा, कारण व्हिटॅमिन सीमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सफरचंद, संत्री, लिंबू तुमच्या रोजच्या आहारात घ्या. हिरव्या भाज्या, गाजर, बीन्स, सिमला मिरची, टोमॅटो पण रोज खा. तसेच कच्चे टोमॅटो खाणे देखील फायदेशीर आहे. लसणाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अशाप्रकारे रोजच्या खाण्याच्या सवयी बदला.

संबंधित बातम्या : 

Health Care : हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्हाला किती लिटर पाण्याची आवश्यकता असते? जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!

Weight Loss : स्लिम व्हायचे आहे? मग, या 5 मसाल्यांचा आहारात समावेश नक्की करा!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली