Weight Loss : स्लिम व्हायचे आहे? मग, या 5 मसाल्यांचा आहारात समावेश नक्की करा!

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करताना दिसत आहेत. जास्त वजनामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. शरीरातील हट्टी चरबी (Fat) काढून टाकण्यासाठी बरेच लोक कठीण आहाराचे पालन करतात. पण तो आहार दीर्घकाळ पाळणे कठीण होते.

Weight Loss : स्लिम व्हायचे आहे? मग, या 5 मसाल्यांचा आहारात समावेश नक्की करा!
वजन कमी करण्यासाठी मसाले फायदेशीर आहेत. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 3:04 PM

मुंबई : वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करताना दिसत आहेत. जास्त वजनामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. शरीरातील हट्टी चरबी (Fat) काढून टाकण्यासाठी बरेच लोक कठीण आहाराचे पालन करतात. पण तो आहार दीर्घकाळ पाळणे कठीण होते. अनेकांना माहित नसलेले अनेक भारतीय मसाले (Spices) आहेत, जे नियमितपणे खाणे खूप फायदेशीर आहे. यात वजन कमी करणे देखील समाविष्ट आहे. त्या मसाल्यांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात ते सर्व मसाले मिळतील. विशेष म्हणजे हे मसाले वजन कमी करण्यासही मदत करतात.

जिरे

जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते. जिरे खाणे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. पोटाची चरबी कमी करण्याची हे खूप जास्त फायदेशीर आहेत. जिरे कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. जिरे पाणी हे एक उत्कृष्ट पेय आहे जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि पित्त उत्सर्जनास प्रोत्साहन देते, यकृताचे आरोग्य सुधारते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाण्याचे नक्की सेवन करा.

काळी मिरी

काळी मिरी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच सर्वात महत्वाचे त्यामध्ये फायबर देखील आहे. काळ्या मिरचीचा चहा वजन नियंत्रणात चांगला काम करतो. काळी मिरीमध्ये पिपेरिन हे एक संयुग असते जे चयापचय कार्य सुधारते आणि शरीराला चरबी पचवण्यास मदत करते.

धने

धन्यामध्ये पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड असते. तसेच जीवनसत्त्वे ए, के आणि सी असतात. धने पचन आणि वजन कमी करण्यास मदत करते. दोन चमचे धने रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गरम करून गाळून घ्या. आपण जर नियमितपणे धन्याच्या पाण्याचे सेवन केले तर शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास नक्की मदत होईल.

हिंग

कोणत्याही भाजीची चव वाढवण्यासाठी चिमूटभर हिंग पुरेसे असते. मात्र, हिंगामध्ये हजारो गुण आहेत. हे चांगले चयापचय, रक्तदाब नियंत्रण आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठी औषधासारखे काम करते. कारण त्यात कार्मिनेटिव्ह, अँटी मायक्रोबियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. अर्धा चमचा हिंग गरम पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Health Care : जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, या आरोग्य समस्या होतील दूर!

Skin Care Tips : या प्रकारे घरी बनवा नाइट क्रीम, त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील!

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.