Skin Care Tips : या प्रकारे घरी बनवा नाइट क्रीम, त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील!

वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेवर (Skin) निस्तेजपणा आणि इतर समस्या निर्माण होतात. आपली त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. असे दिसून आले आहे की लोक त्वचेच्या काळजीसाठी डे केअर रूटीन फॉलो करतात, परंतु ते रात्री झोपण्याच्या अगोदर त्वचेची अजिबात काळजी (Care) घेत नाहीत.

Skin Care Tips : या प्रकारे घरी बनवा नाइट क्रीम, त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील!
नाईट क्रिम त्वचेला लावणे फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 10:08 AM

मुंबई : वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेवर (Skin) निस्तेजपणा आणि इतर समस्या निर्माण होतात. आपली त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. असे दिसून आले आहे की लोक त्वचेच्या काळजीसाठी डे केअर रूटीन फॉलो करतात, परंतु ते रात्री झोपण्याच्या अगोदर त्वचेची अजिबात काळजी (Care) घेत नाहीत. तज्ञांच्या मते रात्री त्वचेची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. ज्यामध्ये चेहरा साफ करणे, सीरम आणि मॉइश्चरायझर (Moisturizer) वापरणे समाविष्ट आहे. त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या क्रीम्स तुम्ही घरीही बनवू शकता. त्या घरी कशा तयार करायच्या हे आपण जाणून घेणार आहोत.

ग्रीन टी क्रीम

त्वचेला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी तुम्ही ग्रीन टीची नाईट क्रीम तयार करू शकता. ही क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला ग्रीन टी, कोरफड, गुलाबपाणी आणि बदामाचे तेल लागेल. क्रीम बनवल्यानंतर एअर टाईट बॉक्समध्ये ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर आणि हातांना लावा. यामुळे आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर राहण्यास मद होईल.

संत्र्याची साल

तेलकट त्वचा असणाऱ्यांना उन्हाळ्यात अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. संत्र्याच्या सालीपासून बनवलेल्या नाईट क्रीमने त्वचेची काळजी घेऊ शकतात. यासाठी एका ब्लेंडरमध्ये दोन संत्र्याची साले घेऊन त्यात संत्र्याचे तेल, जेली आणि ग्लिसरीन टाका. ब्लेंड केल्यानंतर ही पेस्ट घट्ट डब्यात टाका आणि ही क्रीम वापरल्याने टॅनिंगची समस्या दूर होण्यास मदत होते.

कोरफड जेल

आरोग्य आणि केसांव्यतिरिक्त कोरफड हे त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट त्वचेला आतून दुरुस्त करण्याचे काम करतात, एका भांड्यात दोन चमचे कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात 1 चमचे लव्हेंडर तेल घाला, ही पेस्ट चांगली मिक्स करा आणि घट्ट डब्यात ठेवा, ही क्रीम दररोज लावा. या खास क्रिममुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Health Care Tips : अधिक प्रमाणात मांस खाणे टाळा आणि आरोग्याच्या या समस्या दूर करा!

EYE : डोळ्यांखालील काळे डाग आणि सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय फायदेशीर! 

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.