Health Tips | ‘या’ 5 औषधी वनस्पती मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास करू शकतात मदत!

मधुमेह हा असा आजार आहे, ज्यात रक्तामध्ये अधिक प्रमाणात साखर (ग्लुकोज) तयार होते. तणाव, जास्त वजन वाढणे आणि खराब जीवनशैली ही मधुमेहाची मुख्य कारणे आहेत. सर्वात मोठे आव्हान म्हणजे मधुमेह असाध्य आहे, आपण निरोगी आणि संतुलित आहाराचे पालन करूनच त्यावर नियंत्रण ठेवू शकता.

Health Tips | ‘या’ 5 औषधी वनस्पती मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास करू शकतात मदत!
Herbs
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Aug 13, 2021 | 1:55 PM

मुंबई : मधुमेह हा असा आजार आहे, ज्यात रक्तामध्ये अधिक प्रमाणात साखर (ग्लुकोज) तयार होते. तणाव, जास्त वजन वाढणे आणि खराब जीवनशैली ही मधुमेहाची मुख्य कारणे आहेत. सर्वात मोठे आव्हान म्हणजे मधुमेह असाध्य आहे, आपण निरोगी आणि संतुलित आहाराचे पालन करूनच त्यावर नियंत्रण ठेवू शकता. पण काही औषधी वनस्पती आहेत ज्या मधुमेही रुग्णासाठी फायदेशीर आहेत.

सदाबहार

सदाबहार झाडाला पेरीविंकल असेही म्हणतात. ही एक औषधी वनस्पती आहे, जी मुख्यतः भारतात आढळते. या सदाहरित झुडपाची पाने आणि फुले टाईप-2 मधुमेहाच्या उपचारात अत्यंत प्रभावी मानली जातात. ही औषधी वनस्पती मलेरिया आणि घसा खवखवणे या सारख्या इतर आरोग्यविषयक स्थितींवर उपचार करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी, तुम्ही सदाबहारची काही ताजी पाने चावून खाऊ शकता. त्याचे सेवन करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सदाबहरची फुले एक कप पाण्यात उकळणे आणि नंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी पिणे.

बेडकीचा पाला

बेडकीचा पाला अर्थात गुडमारमध्ये फ्लेव्होनॉल आणि ग्वारमारिनसारखे गुणधर्म आहेत. मधुमेहामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते. गुडमार ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी संसर्ग, खोकला आणि बद्धकोष्ठता यासारख्या अनेक आरोग्य समस्यांच्या उपचारांमध्ये वापरली जाते. सकाळी जेवण करण्यापूर्वी सुमारे एक तास आधी एक चमचा गुडमार पानांच्या चुर्णाचे सेवन करावे.

विजयसार (बिब्ला)

विजयसार ही आणखी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यासाठी ओळखली जाते. ही औषधी वनस्पती हायपरलिपिडेमिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. जी शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, विजयसार मधुमेहाची लक्षणे देखील कमी करते, जसे की वारंवार लघवी होणे, जास्त खाणे आणि अवयवांमध्ये जळजळ होणे. यासाठी तुम्ही बाजारात विजयसार वनस्पतीपासून बनवलेले ग्लास सहज मिळवू शकता. या एका ग्लासामध्ये एक कप पाणी ओतायचे आणि ते रात्रभर तसेच ठेवायचे आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करायचे.

गिलोय

मधुमेहाची पातळी आणि मधुमेहाची इतर लक्षणे नियंत्रित करण्यासाठी या वनस्पतीची पाने बरीच प्रभावी आहेत. ही औषधी वनस्पती रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढतात. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा गिलोय पावडर मिसळा आणि रात्रभर तसेच ठेवा, सकाळी लवकर हे पाणी सेवन करा.

जांभूळ

जांभळाच्या बिया इन्सुलिनचा स्राव उत्तेजित करतात. मधुमेह ग्रस्त लोकांसाठी हे फायदेशीर आहेत. जांभळाच्या बिया मूत्रपिंडाशी संबंधित धोका देखील कमी करतात. तसेच मधुमेही रुग्णांमध्ये जखम भरण्याच्या प्रक्रियेला गती देतात. यासाठी रोज सकाळी एक चमचा जांभळाच्या बियांची पावडर एका ग्लास पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी घेऊ शकता.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Side Effects of Almonds : ‘या’ पाच लोकांनी बदामाचं सेवन टाळाच, फायद्याऐवजी होणार नुकसान

मुंबई ते श्रीनगर सहल तेही अवघ्या 27 हजारांत, IRCTC ने जाहीर केलं धमाकेदार टूर पॅकेज!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें