मुंबई ते श्रीनगर सहल तेही अवघ्या 27 हजारांत, IRCTC ने जाहीर केलं धमाकेदार टूर पॅकेज!

आयआरसीटीसी (IRCTC) टुरिझमने अलीकडेच मुंबईपासून श्रीनगरपर्यंत पाच रात्री आणि सहा दिवसांचे टूर पॅकेजेस प्रति व्यक्ती 27,300 रुपये किंमतीत जाहीर केले आहे. भारतीय रेल्वेच्या श्रीनगर दौऱ्यामध्ये गुलमर्ग, सोनमार्ग आणि पहलगाम या ठिकाणांचाही समावेश असणार आहे.

मुंबई ते श्रीनगर सहल तेही अवघ्या 27 हजारांत, IRCTC ने जाहीर केलं धमाकेदार टूर पॅकेज!
IRCTC Tour
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 8:33 AM

मुंबई : आयआरसीटीसी (IRCTC) टुरिझमने अलीकडेच मुंबईपासून श्रीनगरपर्यंत पाच रात्री आणि सहा दिवसांचे टूर पॅकेजेस प्रति व्यक्ती 27,300 रुपये किंमतीत जाहीर केले आहे. भारतीय रेल्वेच्या श्रीनगर दौऱ्यामध्ये गुलमर्ग, सोनमार्ग आणि पहलगाम या ठिकाणांचाही समावेश असणार आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) नियोजलेला हा दौरा 25-26 सप्टेंबर रोजी मुंबईपासून सुरू होईल. आयआरसीटीसी टुरिझम वेबसाईटनुसार, मुंबई ते श्रीनगर हा प्रवास इंडिगोच्या फ्लाईटद्वारे होईल. चला तर, या पॅकेजची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

दिवस 1, मुंबई – श्रीनगर

पहिल्या दिवशी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने पर्यटकांना मुंबईहून श्रीनगरला नेले जाईल. श्रीनगरला पोहोचल्यावर पर्यटक शंकराचार्य मंदिराला भेट देतील. येथील प्रसिद्ध दाल लेक हाऊसबोटमध्ये चेक-इन केले जाईल. त्यानंतर दुपार विश्रांतीमध्ये घालवली जाईल. तर संध्याकाळी पर्यटक दाल लेकवर (स्वखर्चाने) शिकारा राईडचा आनंद घेऊ शकता. येथे रात्रीचे जेवण हाऊसबोटमध्येच दिले जाईल.

दिवस 2, श्रीनगर – पहलगाम

श्रीनगरमध्ये नाश्ता केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांना पहलगामला नेण्यात येईल. वाटेत बेटाब व्हॅली, अवंतीपुरा अवशेष, चंदनवाडी आणि अरु व्हॅलीला भेट दिली जाईल. अशा प्रकारे, आपण नैसर्गिक सौंदर्याचा आनंद देखील घेऊ शकाल. जर तुम्हाला इथे राईडचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला ते तुमच्या स्वखर्चाने करावे लागेल. रात्रीचे जेवण आणि रात्रभर राहण्याची व्यवस्था पहलगाममध्ये केली जाईल.

दिवस 3, पहलगाम – गुलमर्ग – श्रीनगर

न्याहारीनंतर सहल गुलमर्गच्या दिशेने रवाना होईल. वाटेत तुम्ही फुलांच्या शेतांचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला गुलमर्गमधील स्थानिक स्थळांचा आनंद घेण्यासाठी गोंडोला चालवायचा असेल, तर तुम्हाला ते तुमच्या स्वखर्चाने करावे लागेल. यानंतर श्रीनगरला परत येऊन रात्रीचे जेवण करून आणि श्रीनगरमधील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असेल.

दिवस 4, श्रीनगर – सोनमार्ग – श्रीनगर

सकाळी नाश्ता केल्यानंतर, आपण श्रीनगर ते सोनमर्ग मार्गावर कूच केली जाईल. हिवाळ्यात, येथील पर्वत बर्फाच्या चादरीने झाकलेले असतात. थाजीवास ग्लेशियरपर्यंत जाण्यासाठी तुम्ही पोनी भाड्याने घेऊ शकता, जे उन्हाळ्याच्या महिन्यांत एक प्रमुख आकर्षण आहे. यानंतर श्रीनगरला परत येऊन रात्रीचे जेवण करून आणि श्रीनगरमधील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असेल.

दिवस 5, श्रीनगर

न्याहारीनंतर श्रीनगरची स्थानिक ठिकाणे जसे मुगल गार्डन, निशांत बाग, शालीमार गार्डन इत्यादींना भेट दिली जाईल. या भेटीनंतर दाल तलावाच्या काठावर असलेले प्रसिद्ध हजरतबाल मंदिर. संध्याकाळी पर्यटक श्रीनगरमध्ये खरेदीचा आनंद घेऊ शकतात. त्यानंतर हॉटेलमध्ये परत, रात्रीचे जेवण आणि हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम असेल.

दिवस 6 मुंबईला रवाना

सकाळी नाश्ता केल्यानंतर पर्यटकांना बराच वेळ मिळेल. यानंतर हॉटेलमधून चेक आउट आणि नंतर संध्याकाळी 5:35 वाजता श्रीनगर विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान पकडून मुंबईला रवाना केले जाईल.

तुम्ही देखील या सहलीचा आनंद घेऊ इच्छित असाल तर, लवकरात लवकर IRCTCच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लगेचच बुकिंग करता येईल.

हेही वाचा :

IRCTC Package: ‘भारत दर्शन’ ट्रेनने फिरुन या 7 ज्योतिर्लिंग, 13 दिवसांची टूर, खाण्या-पिण्या-राहण्याचा खर्च फक्त….

PHOTO | जगातील 5 सर्वात धोकादायक बेटे; जेथून परत येणे आहे खूप कठीण, जे सुंदर दिसतात पण आहेत प्राणघातक

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.