उंची वाढविण्यासाठी नियमितपणे आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा, जाणून घ्या याबद्दल अधिक!
बरेच लोक कमी उंचीमुळे त्रस्त असतात. उंची वाढवण्यासाठी विविध आैषध उपचार आणि वेगवेगळे उपाय देखील करतात. मात्र, उंची वाढत नाही. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे उंची न वाढण्याची समस्या निर्माण होते.

मुंबई : बरेच लोक कमी उंचीमुळे त्रस्त असतात. उंची वाढवण्यासाठी विविध आैषध उपचार आणि वेगवेगळे उपाय देखील करतात. मात्र, उंची वाढत नाही. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे उंची न वाढण्याची समस्या निर्माण होते. आपल्या शारीरिक विकासासाठी पौष्टिक आहार घेणे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 5 खाद्यपदार्थां विषयी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची उंची वाढण्यास मदत होईल. (Include these 5 foods in your diet regularly to increase height)
बीन्स
बीन्समध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. ज्या आपल्या वाढीस उर्जा देण्यासाठी योग्य ते पोषक पुरवतात. प्रथिने शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. बीन्समध्ये लोह आणि बी जीवनसत्त्व आणि बरेच पोषक घटक असतात जे आपली उंची वाढविण्यात मदत करतात.
चिकन
उंची वाढवण्यासाठी चिकन अत्यंत महत्वाचे आहे. आपण आहारामध्ये चिकनचा समावेश केला पाहिजे. चिकन खाल्ल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. चिकनमध्ये बी जीवनसत्त्वे, प्रथिने असतात. यामुळे उंची वाढण्यास मदत होते.
बदाम
बदामांमध्ये बरीच जीवनसत्त्वे आणि पौष्टिक पदार्थ असतात. जे उंची वाढविण्यासाठी आवश्यक असतात. ते फायबर, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन ई समृद्ध असतात. बदाम हाडांच्या आरोग्यास देखील प्रोत्साहित करतात आणि आपली उंची जलद वाढविण्यात मदत करतात.
अंडी
अंडीमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उंची वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंडीमध्ये राइबोफ्लेविन, बायोटिन आणि लोह असतात. यामुळे आपली उंची झटपट वाढण्यास मदत होते.
दूध
आहारात दुधाचा समावेश करणे आवश्यक आहे. यात प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात. यामुळे उंची वाढण्यास मदत होते. दिवसातून कमीत-कमी एक ग्लास तरी दूध पिले पाहिजे.
संबंधित बातम्या :
Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!https://t.co/eedFAgnEcM#HairCare #HairMask
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020
(Include these 5 foods in your diet regularly to increase height)
