AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा! 

आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच वजन कमी करायचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये कुढल्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल प्रत्येकजण संभ्रमात असतो. योग्य आहार खाल्ल्याने अन्नाची तल्लफ कमी होऊ शकते आणि तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहू शकते.

Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा! 
लठ्ठपणा
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 11:41 AM
Share

मुंबई : आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच वजन कमी करायचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये कुढल्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल प्रत्येकजण संभ्रमात असतो. योग्य आहार खाल्ल्याने अन्नाची तल्लफ कमी होऊ शकते आणि तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहू शकते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होईल. वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी घेतला पाहिजेत. हे आपण बघणार आहोत. (Include these foods in breakfast for weight loss)

पोहे – सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण पोहे खाऊ शकता. त्यामध्ये कॅलरींचे प्रमाण खूप कमी आहे आणि चरबीही अजिबात नाही. पोह्यामध्ये लोह आणि फायबर अधिक असते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते. याशिवाय असे बरेच गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते.

मूग डाळ चीला – मूग डाळ हे प्रथिनांचे पॉवरहाऊस आहे. हे भूक कमी करण्यासाठी मदत करते. भूक हार्मोन घ्रेलिनची पातळी कमी करते. यामुळे तुम्हाला बऱ्याच काळासाठी पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

ओट्स – ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्स देखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. ओट्समुळे पचनक्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रणात येते. ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ओट्स सारखा चांगला नाश्ता दुसरा काहीही असू शकत नाही.

स्प्राउट्स – स्प्राउट्स कंटाळवाणे वाटू शकतात, म्हणून आपण त्यात भाज्या आणि मसाले देखील घालू शकता. त्याची चव अप्रतिम आहे. स्प्राउट सॅलड सहसा साइड डिश म्हणून दिले जाते, परंतु आपण ते नाश्त्यासाठी देखील घेऊ शकता. ते फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द आहेत.

अंडी – अंडी पोषण समृद्ध आहेत. अंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंड्यामध्ये जीवनसत्व बी 12, डी आणि अँटीऑक्सिडेंट्स ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन असतात, ज्यामुळे आपल्या शरीरास बरेच फायदे होतात. अंड्यांद्वारे आपले वजन देखील कमी होते, अंड्यांमधील पौष्टिकतेमुळे आपली चयापचय ठीक होते. अंड्यांमध्ये भरपूर चरबी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

उपमा – उपमा हा देखील दाक्षिणात्य खाद्य पदार्थ आहे. आज तो भारताच्या कानाकोपऱ्यात पसंत केला जातो. उपमा हा पदार्थ पचनास खूप हलका आणि निरोगी आहे. रव्यापासून उपमा तयार केला जातो. वजन कमी करण्यासाठी हा नाश्त्याचा एक चांगला पर्याय आहे. उपम्यामध्ये भरपूर पोषण आहे, जे आपल्या आरोग्यास अनेक मार्गांनी लाभदायक ठरते

संबंधित बातम्या : 

Weight Loss : ‘या’ 4 मार्गांनी चयापचय वाढवा, कॅलरीज लवकर बर्न होतील!

Health Care : कलोंजी दूध अनेक आजारांवर अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल सविस्तर!

(Include these foods in breakfast for weight loss)

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.