AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watermelon : वजन कमी करण्यापासून ते दृष्टी वाढवण्यापर्यंत कलिंगड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहाराकडे (Diet) विशेष लक्ष द्यावे लागते. उन्हाळ्यात भरपूर पाणी असलेले पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये (Summer) आपण दररोज कलिंगडचे सेवन निरोगी राहण्यासाठी करायला हवे. त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. कलिंगडमध्ये (Watermelon) व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक घटक असतात.

Watermelon : वजन कमी करण्यापासून ते दृष्टी वाढवण्यापर्यंत कलिंगड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
कलिंगड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 2:40 PM
Share

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहाराकडे (Diet) विशेष लक्ष द्यावे लागते. उन्हाळ्यात भरपूर पाणी असलेले पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये (Summer) आपण दररोज कलिंगडचे सेवन निरोगी राहण्यासाठी करायला हवे. त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. कलिंगडमध्ये (Watermelon) व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखते, तुम्ही कलिंगडचा रस देखील घेऊ शकता. हे लाइकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, जाणून घेऊया त्याचे आरोग्य फायदे.

  1. हायड्रेटेड ठेवते- कलिंगड तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवते. यामध्ये 90 टक्के पाणी असते, कलिंगड पचनसंस्था निरोगी ठेवते, रक्ताभिसरण सुधारते. यामुळे या हंगामामध्ये कलिंगडचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.
  2. चयापचय वाढवते- कलिंगड चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे आपण खाल्ले अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. यामुळे कलिंगडचा जास्तीत-जास्त समावेश हा आपल्या आहारामध्ये करा.
  3. वजन कमी करण्यासाठी- कलिंगड वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामध्ये कॅलरी खूपच कमी असतात. यामुळे ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, त्यांनी याचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करावा.
  4. किडनीच्या आजारांना दूर ठेवते-  कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. कॅल्शियम रक्तातील यूरिक ऍसिडला प्रतिबंधित करते. त्यामुळे किडनीचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
  5. स्नायू दुखणे- कलिंगडमध्ये सिट्रालिन असते, ते स्नायू दुखणे देखील प्रतिबंधित करते. तुम्ही वर्कआउट करण्यापूर्वी कलिंगडचा रस घेऊ शकता. यामुळे ऊर्जा मिळण्यास मदत होते.
  6. कॅन्सर धोका कमी- कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करते. फ्री रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्यासाठी ओळखले जाते. कलिंगडमध्ये असलेले टायकोपीन प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करते.

संबंधित बातम्या : 

Health Care : या जीवनसत्वाची कमतरता आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा हे जीवनसत्व नेमके कोणते?

Skin Care : हळदीसोबत हे कॉम्बिनेशन करून फेसपॅक तयार करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.