AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्रोड खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचा…

बहुतेक लोक सर्वच हंगामामध्ये अक्रोड खातात. अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते.

अक्रोड खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे वाचा...
अक्रोड
| Updated on: Mar 08, 2021 | 2:41 PM
Share

मुंबई : बहुतेक लोक सर्वच हंगामामध्ये अक्रोड खातात. अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. अक्रोड हा सुक्यामेव्यातील असा एक घटक आहे जो आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मिठाईबरोबर अक्रोड अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये देखील वापरला जातो. (Know the amazing benefits of walnut)

अक्रोडमध्ये ओमेगा-3 हा घटक असतो, जो त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो. अक्रोड ही स्कीन स्क्रबसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. मात्र, या व्यतिरिक्त अक्रोड आपल्याला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतो हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला अक्रोड खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

-अक्रोडच्या झाडाच्या सालातून तयार केलेली पेस्ट ही हिरड्या आणि दातांच्या इतर समस्यांवरील उपचारांसाठी वापरली जाते.

-अक्रोडाची पावडर घ्या आणि त्यात दुध टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार वाटेल आणि चेहऱ्याचा ग्लो देखील वाढेल.

-तेलात अक्रोड फ्राय करा त्यात चवीनुसार पिठी साखर घाला. हे दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे कोरडा खोकला नाहीसा होईल.

-अक्रोडाच्या वाळलेल्या खोडाची साल घ्या, त्याची पावडर करा त्यात चिमूटभर लवंग मिसळून दंत पावडर म्हणून तुम्ही वापरू शकता.

-भाजलेले अक्रोड नियमितपणे खाल्याने शरीरातील ताकद वाढण्यास मदत होते.

-आजारपणात किंवा स्नायूंच्या अशक्तपणामध्ये अक्रोड खाणे चांगले असते.

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!

(Know the amazing benefits of walnut)

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत