AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनीरची भाजी खाऊन कंटाळलायत? मग, घरच्या घरी बनवा झटपट पनीर फ्राइड राईस!

पनीर हा पदार्थ लहान मुलांपासून सगऴ्यांचा आवडीचा आहे. आपण व्हेज असाल तर कायम पनीर बटर मसाला, पालक पनीर, पनीर म्युचियन किंवा पनीर टिक्का बनवतो किंवा हॉटेलमधून मागवतो. पनीरमधून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं. त्यामुळे पनीर आरोग्यासाठी खूप पदार्थ आहे. पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला पनीर खाण्याचे फायदे आणि पनीरची एक खास रेसिपी सांगणार आहोत.

पनीरची भाजी खाऊन कंटाळलायत? मग, घरच्या घरी बनवा झटपट पनीर फ्राइड राईस!
Paneer Fried Rice
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 3:24 PM
Share

मुंबई : पनीर हा घरोघरी आवडीने खाणारा पदार्थ आहे. दूधापासून तयार हा पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असतात. ते लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवश्यक असतात. तर या पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जाऊ शकतात. आणि पनीर खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. पाहूयात पनीर खाल्ल्याचे फायदे

पनीर खाल्ल्याचे फायदे

  1. 100 ग्रॅम पनीरमधून आपल्याला 18 ग्रॅम प्रोटीन्स मिळतं. ज्यामुळे आपले स्नायू बळकट होतात. आणि ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी आपल्या जेवण्यात पनीरचा समावेश करावा.
  2. जे लोकं मांस खात नाही त्यांचासाठी पनीर हा उत्तम पर्याय आहे.
  3. पनीर खाल्ल्यामुळे भुकेवर नियंत्रण राहतं.
  4. पनीरमध्ये कॅल्शियमही असतं त्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.
  5. पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते.

हे झालेत पनीर खाण्याचे फायदे आता घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशाप्रकारे पनीर फाईड राईस बनता येईल. त्यासाठी ही या काही खास टिप्स :

पनीर फाईड राईस

साहित्य :

200 ग्रॅम पनीरचे तुकडे

1 कप उकडलेले तांदूळ

1/2 टीस्पून लाल तिखट

1/2 टीस्पून काळी मिरी

काही गाजर

एक शिमला मिरची

आले-लसूण पेस्ट

थोडे सोया सॉस

एक कांदा

चवीनुसार मीठ

कृती :

स्टेप 1 : सर्व प्रथम 1 कप तांदूळ घ्या त्यात मीठ टाकून उकळवा.

स्टेप 2 : आता एक कढई तेल घ्या आणि पनीरचे तुकडे तळून घ्या. आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. यासोबत तळलेले पनीरचे तुकडेटाका.

स्टेप 3 : एका कढईत तेलात कांदा आणि शिजवलेल्या भाज्या घ्याला. बारीक चिरलेलं लसून आणि आलं टाका.

स्टेप 4 : आता कढईत शिजलेला भात, पनीर, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घाला.

तयार झाला झटपट पनीर फ्राईड राईस. हा राईस लहान मुलं आवडीने खातात.

हेही वाचा :

शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय फायदेशीर!

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहात, आणि डायटिंग पण तरी होत नाही वजन कमी…मग हा उपाय करुन बघा…

ख्रिसमसची लगबग, टीव्ही9 कडून ख्रिसमसचं खास गिफ्ट, घरच्या घरी बनवा खास ड्रायफ्रूट केक

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.