AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri Special Recipe : उपवासासाठी तयार करा भगरेचा खास पुलाव, जाणून घ्या रेसिपी!

नवरात्री दरम्यान नऊ दिवस फक्त फळे खाऊन उपवास पकडणे थोडे अवघड जाते. या दरम्यान, बहुतेक लोक साबुदाणा खिचडी, बक्कीट पुरी किंवा पराठे इत्यादी बनवतात. उपवासादरम्यान कधी-कधी चवदार अन्न खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी आपण भगरेचा पुलाव तयार करून खाऊ शकता.

Navratri Special Recipe : उपवासासाठी तयार करा भगरेचा खास पुलाव, जाणून घ्या रेसिपी!
भगर पुलाव
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 11:27 AM
Share

मुंबई : नवरात्री दरम्यान नऊ दिवस फक्त फळे खाऊन उपवास पकडणे थोडे अवघड जाते. या दरम्यान, बहुतेक लोक साबुदाणा खिचडी, बक्कीट पुरी किंवा पराठे इत्यादी बनवतात. उपवासादरम्यान कधी-कधी चवदार अन्न खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी आपण भगरेचा पुलाव तयार करून खाऊ शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागत नाही. हे खूप कमी वेळेत सहज बनवता येते. जर तुम्ही उपवासादरम्यान काहीतरी स्वादिष्ट खाण्यास उत्सुक असाल, तर तुम्ही नक्की भगरेचा भात खाल्ला पाहिजे.

साहित्य

एक कप भगर, क्वार्टर कप शेंगदाणे, दोन बटाटे, एक चमचा जिरे, दोन चमचे तूप, 4 हिरव्या मिरच्या, एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन कप पाणी आणि चवीनुसार मीठ.

कसे बनवावे

-सर्वप्रथम बटाटे धुवून ते उकळण्यासाठी ठेवा आणि भगर धुवून पाण्यात भिजवा. सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर भगरमधील पाणी काढून टाका आणि झाकून ठेवा आणि काही काळ सोडा.

-या दरम्यान, भगरेचा भात तयार करण्यासाठी उर्वरित तयारी करा. उकडलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करून हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.

-आता गॅसवर एक कढई ठेवा आणि तूप घालून गरम करा. सर्वप्रथम त्यात शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे हलके तपकिरी झाल्यावर त्यांना एका भांड्यात काढून घ्या.

-आता त्यात जिरे घाला आणि तडतडू द्या. यानंतर बटाटे घालून थोडे मीठ टाका आणि बटाटे सुमारे दोन ते तीन मिनिटे तळून घ्या. यानंतर भगर घालून दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा आणि आणखी दोन मिनिटे राहूद्या.

-आता त्यात पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि शेंगदाणे घाला. यानंतर ते उकळू द्या. उकळल्यानंतर गॅस कमी करा आणि पॅन झाकून ठेवा.

-सुमारे 20 ते 25 मिनिटे शिजू द्या. भगर शिजल्यावर गॅस बंद करा आणि चिरलेली कोथिंबीरवरून टाका. आता गरम गरम सर्व्ह करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Navratri Special Recipe, Special recipe of Bhagar pulao)

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.