AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : बटाट्याचा रस अनेक आरोग्य समस्यांवर गुणकारी, जाणून घ्या याबद्दल अधिक! 

आपण अनेकदा बटाटे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत असे मानतो. पण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. बटाट्याची कोणतीही रेसिपी बनवा किंवा बटाट्याचा रस प्या, दोन्ही प्रकारात बटाटे फायदेशीर आहेत.

Health Care : बटाट्याचा रस अनेक आरोग्य समस्यांवर गुणकारी, जाणून घ्या याबद्दल अधिक! 
बटाट्याचा रस
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : आपण अनेकदा बटाटे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत असे मानतो. पण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. बटाट्याची कोणतीही रेसिपी बनवा किंवा बटाट्याचा रस प्या, दोन्ही प्रकारात बटाटे फायदेशीर आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमीच धोकादायक असतो. आज आपण जाणून घेणार आहोत बटाट्याच्या रसाचे फायदे.

– बटाट्याचा रस म्हणजे काय?

बटाट्याचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते, ते जीवनसत्त्वे बी आणि सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि तांबे याने समृद्ध आहे आणि इतर आरोग्य फायद्यांसह रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास बटाट्याचा रस मदत करतो.

– बटाट्याचा रस कसा बनवायचा?

5 मध्यम आकाराचे बटाटे सोलून घ्या, लहान चौकोनी तुकडे करा. आता त्यांना ज्युसरमध्ये ठेवा आणि ताजा रस काढा. ताजे सर्व्ह करा. त्यामध्ये काहीही मिक्स न करता पिल्याने अनेक फायदे होतात.

– रोगप्रतिकारक शक्ती वाढते

यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे सर्दी आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रिकाम्या पोटी एक ग्लास बटाट्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

– संधिवात उपचार करते

बटाट्याचा रस त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. जो संधिवात आणि इतर सांधे संबंधित समस्यांवर उपचार करण्यास मदत करतो. तज्ज्ञांच्या मते, बटाट्याचे तुकडे दुखणाऱ्या भागावर लावल्यानेही फायदा होतो.

– अल्सरपासून आराम मिळतो

बटाट्याचा रस गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्याचे रक्षण करण्यासाठी देखील ओळखला जातो आणि तज्ञांच्या मते, बटाट्याचा रस सकाळी नियमितपणे सेवन केल्यास अल्सरवर उपचार करण्यास मदत होते.

– कोलेस्ट्रॉल कमी करते

बटाट्याच्या रसामध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे ए, बी-कॉम्प्लेक्स आणि सी असतात. तज्ञांच्या मते, हे पोषक घटक एकत्रितपणे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.

– बद्धकोष्ठता दूर करते

यामध्ये भरपूर फायबर असते. जे पचनसंस्थेला साफ करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

– कर्करोगाचा धोका कमी होतो

बटाट्याचे नियमित सेवन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.त्यामध्ये ग्लायकोआल्कलॉइड्स नावाचे रासायनिक संयुग असते. ज्यामध्ये ट्यूमर-विरोधी गुणधर्म असतात आणि कर्करोगाची शक्यता कमी करण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!

(Potato juice is extremely beneficial for health)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.