AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Herbal Teas : तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ‘या’ हर्बल टी फायदेशीर!

अनेक वर्षांपासून ताणतणाव कमी करण्यासाठी चहाचे सेवन केले जाते. एक कप हर्बल टी पिणे, विशेषतः दररोज सकाळी आणि संध्याकाळी, प्रत्येकासाठी आरामदायी असू शकते. हे अशा लोकांसाठी आहे जे तणाव आणि चिंताग्रस्त नेहमीच असतात.

Herbal Teas : तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी 'या' हर्बल टी फायदेशीर!
खास पेय
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 11:15 AM
Share

मुंबई : अनेक वर्षांपासून ताणतणाव कमी करण्यासाठी चहाचे सेवन केले जाते. एक कप हर्बल टी पिणे, विशेषतः दररोज सकाळी आणि संध्याकाळी, प्रत्येकासाठी आरामदायी असू शकते. हे अशा लोकांसाठी आहे जे तणाव आणि चिंताग्रस्त नेहमीच असतात. येथे काही हर्बल टी आहेत ज्या तणाव नियंत्रित करण्यास मदत करतात.

अश्वगंधाचा चहा

शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये अश्वगंधा वापरले जात आहे. ही औषधी वनस्पती अॅडप्टोजेन आहे, एक नैसर्गिक पदार्थ जो शरीराला तणावाशी जुळवून घेण्यास मदत करतो. हे सहजपणे एक डेकोक्शन किंवा चहा म्हणून सेवन केले जाऊ शकते.

अश्वगंधा शरीरातील हार्मोन्स संतुलित करते. कारण हार्मोनल असंतुलनामुळे अनेकदा मूड बदलणे, वजन वाढणे आणि तणाव निर्माण होतो. अश्वगंधामध्ये तणाव, चिंता यांचा सामना करण्यासाठी गुणधर्म आहेत.

दालचिनी चहा

अभ्यासातून असे दिसून आले आहे की दालचिनीचा सुखदायक सुगंध तुमच्या शरीराला आराम देऊ शकतो, ज्यामुळे तणाव कमी होतो. एका कप चहामध्ये दालचिनी घातल्याने चहाची चव तर वाढेलच, पण तुम्हाला तणावमुक्तीसह अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतील. लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यासह अनेक आरोग्य समस्यांचे हे एक प्रमुख कारण आहे. दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे तणाव कमी होतो.

ग्रीन टी

ग्रीन टीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्या फायद्यांमध्ये चयापचय वाढवणे, वजन कमी करणे आणि प्रतिकारशक्ती वाढवणे. मुख्यतः चहाच्या रोपामध्ये आढळणारे थेनाइन हे अमिनो आम्ल तणाव कमी करण्यास मदत करते. जपानमधील एका विद्यापीठाच्या संशोधनात असेही आढळून आले की, ग्रीन टीचे सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची पातळी कमी होते.

तुळशीचा चहा

तुळशीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील पेशी आणि अवयवांचे निर्विषीकरण होण्यास मदत होते. तुळशीमुळे मन शांत होण्यास आणि तणाव दूर करण्यासही मदत होते. तुळशीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.