AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिना केमिकलचा घरगुती मटण मसाला! जाणून घ्या सोपी रेसिपी आणि टिकवण्याचे खास टिप्स

नॉनव्हेज पदार्थांचे खवय्ये असाल, तर ‘मटण मसाला’ तुमच्या स्वयंपाकघरात हमखास असतोच! चिकन, मटण किंवा बिर्याणी कुठल्याही मांसाहारी डिशमध्ये जर खरी चव हवी असेल, तर खास मसाल्याची भाजीला गरज असते. बाजारातील महागडे आणि केमिकलयुक्त मसाले टाळून, तुम्ही घरच्या घरी अगदी कमी खर्चात आणि सहज पद्धतीने झणझणीत मटण मसाला तयार करू शकता. यामुळे तुमचे पदार्थ चविष्ट तर बनतीलच, पण आरोग्यदृष्ट्याही सुरक्षित राहतील. या लेखात जाणून घ्या घरगुती मटण मसाला तयार करण्याची सोपी रेसिपी, टिकवून ठेवण्याचे उपाय आणि योग्य वापराच्या टिप्स!

बिना केमिकलचा घरगुती मटण मसाला! जाणून घ्या सोपी रेसिपी आणि टिकवण्याचे खास टिप्स
meat masalaImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jun 22, 2025 | 3:50 PM
Share

भारतासारख्या देशात नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चिकन, मटण किंवा बिर्याणी असो चव अधिक उठावदार करण्यासाठी ‘मटण मसाला’ हा एक अत्यावश्यक घटक मानला जातो. बाजारात मिळणारा मसाला महाग असतो आणि अनेकदा त्यात संरक्षक रसायनांचाही वापर केला जातो. त्यामुळेच आता अनेकजण घरीच हा मसाला तयार करण्याचा पर्याय निवडत आहेत.

मटण मसाला म्हणजे काय?

मटण मसाला हा एक मिश्र मसाला असतो जो विविध सुगंधी आणि गरम मसाल्यांपासून तयार केला जातो. याचा वापर चिकन, मटण, अंडी करी, सोया चंक्स किंवा अगदी काही भाज्यांमध्ये देखील करता येतो. त्याचा स्वाद इतका प्रभावी असतो की इतर कोणतेही मसाले वेगळे घालण्याची गरज राहत नाही.

मटण मसाला बनवण्यासाठी खालील साहित्य लागते:

• लाल मिरची

• काळी मिरी

• लवंग

• जायफळ

• धणे

• तेजपत्ता

• हिरवी व काळी वेलदोडी

• कसुरी मेथी

• दालचिनी

• बडीशेप

• जिरे

• जावित्री

• सुकं आले (सुंठ)

• लसूण पावडर

• हळद

• काश्मिरी मिरची पावडर

• मोहरी

• हिंग

मटण मसाला बनवण्याची कृती

या सर्व मसाल्यांना कोरड्या कढईत मंद आचेवर एकत्र भाजून घ्यावं. भाजताना त्यातून सुगंध येऊ लागल्यावर त्यांना गॅसवरून उतरवून एका थाळीत थंड होऊ द्यावं. पूर्ण थंड झाल्यावर हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं. तयार झालेल्या मसाला पावडरला एअरटाइट डब्यात भरून ठेवावं.

टिकवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

1. मटण मसाला जास्त दिवस टिकवण्यासाठी सर्व साहित्य 3-4 तास उन्हात सुकवावं.

2. मसाला ठेवण्याआधी एअरटाइट डबा कोरडा आणि स्वच्छ असावा.

3. मसाल्याच्या डब्यात ओलसर चमचा वापरणं टाळा.

4. मसाल्यात पाणी शिरू देऊ नये, अन्यथा तो लवकर खराब होऊ शकतो.

मटण मसाल्याचा वापर कसा कराल?

मटण मसाला इतका परिपूर्ण असतो की इतर कोणतेही मसाले घालण्याची आवश्यकता राहत नाही. तुम्ही चिकन किंवा मटण करत असाल तर फक्त हा मसाला आणि चवीनुसार मीठ वापरा. तो तुम्ही बिर्याणीमध्ये, ग्रेव्ही प्रकारात, अगदी काही भाज्यांमध्येही वापरू शकता.

थोडक्यात सांगायचं झालं तर, घरी तयार केलेला मटण मसाला आरोग्यास सुरक्षित, चविष्ट आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर पर्याय आहे. तो बनवायला वेळ व पैसा दोन्ही कमी लागतो, पण त्याचा स्वाद फारच उठावदार आणि टिकाऊ असतो. त्यामुळे एकदा नक्की करून पाहा!

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.