पिळदार शरीर बनवायचंय? मग ‘अशा’ पद्धतीने खा बदाम, 10 पटीने वाढेल ताकद

हिवाळ्यात आहारामध्ये बदामाचा नियमित समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्वचा निरोगी राहते. त्यासोबतच शरीराला ताकद मिळते. या दिवसांमध्ये बदामाचे सेवन कसे करावे? हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पिळदार शरीर बनवायचंय? मग 'अशा' पद्धतीने खा बदाम, 10 पटीने वाढेल ताकद
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 7:37 AM

गुलाबी थंडी सुरु झाली की तरुण मंडळींना पिळदार शरीर बनवण्याचे वेध लागतात. मग, पिळदार शरीरासाठी काय खावे, काय खाऊ नये, याचीही चर्चा रंगू लागते. आज आम्ही तुमचं शरीर पिळदार बनण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. हिवाळ्यात आहारामध्ये बदामाचा नियमित समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, त्वचा निरोगी राहील आणि शरीराला ताकद मिळेल. या दिवसांमध्ये बदामाचे सेवन कसे करावे? हे आहारतज्ज्ञांकडूनच जाणून घ्या.

बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूला चालना देतात. त्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदय निरोगी ठेवतात. बदामातील फायबर आणि प्रथिने वजन कमी करतात आणि शरीराची ताकद वाढवतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे हाडे मजबूत करतात. बदामातील जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रतिकारशक्ती मजबूत करतात. हिवाळ्यात बदाम खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण हिवाळ्यात बदामाचे सेवन कसे करावे, याची आज आपण माहिती घेणार आहोत.

बदाम खाण्याचे फायदे कोणते?

बदामामध्ये कार्बोहायड्रेट कमी असतात, परंतु फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. त्यातील फायबर गुणधर्म बद्धकोष्ठता दूर करतात. बदामामध्ये पोटॅशियम आणि कमी सोडियमचे प्रमाण असते. जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. बदामाचे नियमित सेवन केल्याने तुमचे शरीर निरोगी आणि ऊर्जावान राहण्यास मदत होते.

स्नॅक्स म्हणून बदाम खा : हलके भाजलेले किंवा ताजे बदाम देखील दिवसभर स्नॅक म्हणूनही तुम्ही खाऊ शकता. थंडीत भूक भागवण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे.

गरम पेयांमध्ये बदाम घालून खावे : बदाम चहा किंवा गरम दुधात घालून सेवन करता येतात. यामुळे पेयाची चव तर वाढेलच, शिवाय बदामातील पोषक तत्त्वेही शरीराला उपलब्ध होतील.

बदाम पावडर किंवा लाडू : हिवाळ्यात बदाम पावडर किंवा लाडू खाऊ शकता. हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा आणि उष्णता प्राप्त होते.

बदामासह तूप आणि मध : 5-6 बदाम हलके तळून तूप आणि मधाबरोबर खावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

बदामाचे दूध : हिवाळ्यात बदामाचे दूध गरम करून सेवन करावे. हे शरीर उबदार ठेवते. यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आणि प्रथिनेही असतात. हळद आणि थोडी साखर मिसळून तुम्ही ते पिऊ शकता.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.