Salt Uses | एका दिवसात किती मीठाचे सेवन ठरेल फायदेशीर? जाणून घ्या…

जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान होते. तसेच, मीठाचे अधिक सेवन केल्याने आजारांना निमंत्रण मिळते.

Salt Uses | एका दिवसात किती मीठाचे सेवन ठरेल फायदेशीर? जाणून घ्या...
जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान होते.

मुंबई : आहारात मीठ जास्त प्रमाणात सेवन करणे नेहमीच धोकादायक ठरते. असे म्हणतात की, जर अन्नातील मीठ आपल्या चवीनुसार नसेल, तर आपल्याला ते पदार्थ आवडत नाही. तथापि, बरेच लोक एरव्हीसुद्धा जास्त मीठ सेवन करणे पसंत करतात. परंतु, ही सवय आपल्या शरीरासाठी कोणत्याही प्रकारे लाभदायी ठरत नाही. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान होते. तसेच, मीठाचे अधिक सेवन केल्याने आजारांना निमंत्रण मिळते. याचे फायदे तर नाहीच, मात्र अनेक तोटे आहेत (Know about harmful side effects of salt).

आज आम्ही तुम्हाला अधिक मीठ खाण्याने काय समस्या उद्भवतात त्याबद्दल सांगणार आहोत. यासह, दिवसभरात आपण किती मीठ खावे जेणेकरुन आपले आरोग्य व्यवस्थित राहील आणि तब्येत देखील सुधृढ राहील हे ही जाणून घेऊया.

एका दिवसांत किती मीठ सेवन करावे?

तज्ज्ञ म्हणतात की, जर आपल्याला निरोगी रहायचे असेल, तर आपण एका दिवसात केवळ 2300 मिलीग्राम मीठ खावे. यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राहील. जर आपण अन्नातील मीठाच्या प्रमाणावर लक्ष दिले नाही तर, ते वारंवार रक्तदाब सारख्या गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकते. इतकेच नव्हे तर जास्त प्रमाणात मीठ खाण्याने हृदयाशी संबंधित अनेक आजार उद्भवतात.

हृदयावर मीठाचा परिणाम

जेव्हा आपण रक्तदाब किंवा हृदयरोगांबद्दल विचार करतो तेव्हा त्याची सुरुवात आहारातील मीठापासून होते. या समस्या टाळण्यासाठी बरेच लोक कमी-सोडियम असलेला आहार घेतात. तथापि, खाण्यातील सोडियम कमी केल्याने हृदयाला कोणताही धोका नाही, हा समाज पूर्णपणे चुकीचा आहे (Know about harmful side effects of salt).

सोडियमचे सेवन कमी केल्याने देखील काही लोकांना रक्तदाबाची समस्या होऊ शकते. परंतु, काही लोकांमध्ये सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब वाढल्याचे आढळले आहे. कमी सोडियममुळे हृदय गती आणि हृदयावरील दाब देखील वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 1.5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाऊ नये अन्यथा हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्याच वेळी, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

सोडियम हे एक आवश्यक पोषक तत्व आहे आणि बर्‍याच अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, बहुतेक लोकांनी हृदय निरोगी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज 3-6 ग्रॅम दरम्यान सेवन केले पाहिजे. बहुतेक लोक या प्रमाणातच सोडियम घेतात

मीठामुळे उद्भवणाऱ्या इतर समस्या

यामुळे डिहायड्रेशनची समस्या देखील उद्भवू शकते. वास्तविक, मीठातील सोडियम उच्च रक्तदाब वाढवतो. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने आपल्या मूत्रपिंडातही दगडांचा अर्थात किडनी स्टोनचा त्रास देखील होऊ शकतो. तसेच, मीठाचे अधिक सेवन लठ्ठपणाच्या समस्येला निमंत्रण देते.

(Know about harmful side effects of salt)

(टीप : सदर माहिती संशोधनावर आधारित असून, कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Published On - 12:16 pm, Sat, 30 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI