Cooking Oil | कोणते तेल स्वयंपाकासाठी अधिक फायदेशीर? ‘या’ तेलाने दूर होतील आरोग्याच्या समस्या…

मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल, स्वयंपाकासाठी वापरलेली जाणारी प्रत्येक तेलं नैसर्गिक फळ किंवा बियाण्यांपासून तयार केली जातात. (Oil for good health)

Cooking Oil | कोणते तेल स्वयंपाकासाठी अधिक फायदेशीर? ‘या’ तेलाने दूर होतील आरोग्याच्या समस्या...
खाद्यतेलावर स्टॉक मर्यादा नियम लागू, पण किमती कमी होण्यास लागेल वेळ

मुंबई : खाद्यतेल आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता ‘मिशन मोड’मध्ये काम करण्याची योजना आखत आहे. त्याअंतर्गत विविध स्त्रोतांकडून खाद्य तेलाचे वाढते उत्पादन करण्याबरोबरच तेलाच्या आर्थिक वापरासाठी जनजागृती देखील केली जाईल. तज्ज्ञांच्या मते, मोदी सरकारच्या या नवीन मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरता आणणे, हे आहे (Know which oil is more beneficial for good health).

तसेच त्याच्या आयातीवर खर्च केका जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या हातावर ठेवावा लागणार आहे. पण, तुम्हाला माहित आहे का स्वयंपाक करण्यासाठी कोणते तेल सर्वोत्तम आहे? मोहरी तेल, कॅनोला तेल, नारळ तेल, शेंगदाणा तेल इ. अशी अनेक तेलं आहेत, जी अन्न शिजवण्यासाठी वापरली जातात. परंतु, कोणते तेल आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे, हे जाणून घेऊया…

खाद्यतेलात आढळतात अनेक प्रकारच्या चरबी

मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल, स्वयंपाकासाठी वापरलेली जाणारी प्रत्येक तेलं नैसर्गिक फळ किंवा बियाण्यांपासून तयार केली जातात. यासाठी ते मशीनमध्ये दाबले जातात आणि प्रक्रियेनंतर त्यातून वापरासाठी तेल काढले जाते. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलात चरबी खूप जास्त आहे. यापैकी संतृप्त चरबी, मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी आम्ल आहेत.

काही वर्षांपासून आरोग्याच्या बाबतीत नारळ तेल चांगले मानले जात असे. हे इतके चांगले मानले जात होते की लोकांनी त्याला सुपर फूड म्हटले आहे, परंतु हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधन अहवालाने त्याची गुणवत्ता आरोग्यदायी नसल्याचे म्हटले आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी रिसर्चने नारळ तेलाला शुद्ध विष म्हटले.

गंभीर रोगांचे कारण

तेलात जास्त प्रमाणात चरबी असल्याने आणि मानवी शरीर जास्त चरबी पचवू शकत नाही. म्हणूनच, जेव्हा आपण तेलयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपल्या शरीरात चरबी जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे हृदयरोग आणि रक्तदाबासारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. यामागील कारण म्हणजे फॅटी आम्ल सिंगल बॉन्ड्सद्वारे जोडलेले आहेत, ज्याला सॅच्युरेटेड फॅट म्हणतात, ज्यात फॅटी आम्ल कण असतात (Know which oil is more beneficial for good health).

LDL आणि HDL म्हणजे काय?

आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL). एलडीएलला बर्‍याचदा बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. हे यकृतापासून पेशींमध्ये कोलेस्ट्रॉल साठवते. जर, शरीरात त्याचे प्रमाण जास्त असेल, तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. एचडीएल चांगला कोलेस्ट्रॉल मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, हे कोरोनरी हृदयरोग आणि स्ट्रोक टाळण्यास मदत करते.

कोणते तेल फायदेशीर?

म्हणून, तज्ज्ञ म्हणतात की, असे तेल खाणे चांगले आहे, ज्यामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण कमी असेल. तसेच तेल फक्त थोड्या प्रमाणातच खावे. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा -3,6 फॅट ऑइल खाणे चांगले. हे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. तसेच, त्यातून शरीराला आवश्यक फॅटी आम्ल आणि जीवनसत्त्वे मिळतात. एका सर्वेक्षणात असे आढळले आहे की, ऑलिव्ह ऑईलचा जास्त वापर केल्याने हृदयरोग होण्याचा धोका पाच टक्क्यांपर्यंत कमी होतो.

ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह ऑईल म्हणजे भूमध्यसागरीय प्रदेशातील पारंपारिक ओले युरोपीया वृक्षाच्या (ऑलिव्ह ट्री) फळापासून प्राप्त केलेली चरबी आहे. ऑलिव्ह फोडून त्यांच्या लगद्यामधून ऑलिव्ह ऑईल काढले जातात. हे सध्याचे सर्वात आरोग्यदायी तेल मानले जाते. असे म्हणतात की, याच्या वापरामुळे हृदयविकार दूर होतात.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Know which oil is more beneficial for good health)

हेही वाचा :

अंधश्रद्धा नव्हे, वाडवडीलांच्या ‘या’ गोष्टीमागे दडलीत वैज्ञानिक कारणे! जाणून घ्या या कारणांबद्दल…

Carom Seeds | ओव्याच्या लहान-लहान दाण्यांमध्ये मोठे औषधी गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे!

Published On - 9:21 am, Tue, 23 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI