मुलाखतीला जाताना इंग्रजीची भीती वाटते? मग या खास टिप्स तुमच्यासाठी

आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरीसाठी उत्तम इंग्रजी बोलता येणं अत्यावश्यक बनलं आहे. तर आजपासूनच या टिप्स फॉलो करा आणि तुमचं इंग्लिश कधी सुधारेल हे तुम्हालाही कळणार नाही. ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि बॉसही तुमचं कौतुक करेल.

मुलाखतीला जाताना इंग्रजीची भीती वाटते? मग या खास टिप्स तुमच्यासाठी
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 9:31 PM

आजच्या कॉर्पोरेट दुनियेत यशस्वी होण्यासाठी इंग्लिश भाषा शिकणं हे केवळ पर्याय राहिलेला नाही, तर एक गरज बनली आहे. ऑफिसमधील मीटिंग्स असो, मेल्स असो किंवा टीममेट्ससोबतचं संवाद सगळीकडे इंग्लिशचं वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत जर तुमचं इंग्लिश कमकुवत असेल, तर ते तुमच्या आत्मविश्वासावर आणि कामगिरीवर परिणाम करू शकतं.

इंग्लिश शिकण्यासाठी काही सोप्या आणि उपयोगी टिप्स

रोज थोडा वेळ द्या: दररोज किमान 10-15 मिनिटं इंग्लिशमध्ये वाचन करा जसं की The Hindu, BBC News यासारखे न्यूज सोर्सेस. याशिवाय Duolingo, BBC Learning English, Cake हे अ‍ॅप्स वापरा.

कॉर्पोरेट वाक्य पाठ करा: “Can you please clarify?”, “I’ll follow up on this” यासारखे रोजचे वाक्य लक्षात ठेवा आणि त्यांचा वापर आयनासमोर बोलून किंवा मित्रांशी संवाद करताना करा.

ऐकून शिका: BBC The English We Speak, TED Talks किंवा YouTubeवरील प्रोफेशनल प्रेझेंटेशन ऐका. तिथून उच्चार, शब्दसंग्रह, बोलण्याची शैली शिकता येते.

एआय टूल्सचा उपयोग करा: मेल लिहिताना Grammarly वापरा. ChatGPT किंवा Google Bard कडून “Write simple professional sentences for meetings” असं प्रॉम्प्ट वापरून शिकू शकता. Speechling वापरून उच्चार सुधारा.

ऑफिसमध्ये इंग्लिश बोलायला सुरूवात करा: “How’s the project going?” असं एखादं वाक्य बोलून संवाद सुरू करा. चुका झाल्या तरी चालतात. टीममेट्स बहुतेक वेळा मदत करतात.

ईमेल राइटिंग सराव करा: मेल लिहायचा सराव करा. Grammarly, Hemingway App यांचा वापर करून स्टाइल सुधारता येते. उदाहरणार्थ – “Subject: Follow-up on [Project Name]”.

इंग्लिश स्पीकिंग ग्रुप्समध्ये सहभागी व्हा: Toastmasters, Meetup यासारख्या प्लॅटफॉर्मवर इंग्लिश बोलणाऱ्या ग्रुप्स मिळतात. यातून भरपूर सराव होतो.

नवीन शब्द शिका: रोज 5-10 कॉर्पोरेट शब्द जसं की ‘deadline’, ‘feedback’, ‘collaborate’ यासारखे शब्द लक्षात ठेवा. Quizlet अ‍ॅप वापरून फ्लॅशकार्ड तयार करा.

कॉन्फिडेंस ठेवा: छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. चुका झाल्या तरी घाबरू नका. दररोज सराव करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

ऑफिसमध्ये रोज उपयोगी पडणारी 25 इंग्लिश वाक्य –

मीटिंग आणि चर्चा :

Can we start the meeting now?

I agree with your point.

Could you please clarify this?

I have a question about this.

Let me share my thoughts.

I’ll take note of that.

Can we discuss this further?

I need some time to review this.

That’s a great idea!

Let’s schedule a follow-up meeting.

टीममेट्सशी संवाद:

How’s the project going?

Can you help me with this task?

I’ll get back to you soon.

Thank you for your support.

I’m working on it right now.

Could you share the document, please?

Let’s collaborate on this.

I appreciate your feedback.

Can we meet to discuss this?

I’ll update you by the end of the day.

ईमेल आणि लिखित संवाद:

Please find the attached file.

I’m writing to follow up.

Thank you for your quick response.

Please let me know if you need more details.

I look forward to your reply.