Natural Deodorant : शरीराला येतोय दुर्गंध ? करा फक्त हे काम, मिळेल नैसर्गिकरित्या सुगंध
Natural Deodorant : बरेच लोक असे असतात ज्यांना डिओड्रंटची ॲलर्जी असते. तुम्हालाही असा त्रास असेल तर तुम्ही डिओड्रंट ऐवजी नैसर्गिक गोष्टी वापरू शकता.

नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यातही बऱ्याच जणांना खूप घाम (sweat) येतो आणि त्यामुळे शरीराला दुर्गंधही (body odour) येतो. घामामुळे येणारा दुर्गंध टाळण्यासाठी बहुतेक लोक परफ्यूम आणि डिओड्रंट्सचा (Deodorant) वापर करताना दिसतात. तर काही लोकं पॉकेट डिओदेखील वापरतात. पण डिओड्रंटमध्ये असलेले पॅराबेन आणि ॲल्युमिनियमसारखे घटक आपल्या शरीराचे अनेक प्रकारे नुकसान करतात.
काही लोकं तर असेही असता, ज्यांना या गोष्टींची ॲलर्जी असू शकते. तुम्हालाही डिओ लावताना या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. यामुळे शरीराची दुर्गंधी नियंत्रित राहते आणि कोणतेही नुकसानदेखील होत नाही.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा स्वच्छता उत्पादन म्हणून वापरला जाऊ शकतो. एका बाऊलमध्ये थोडा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या अंडरआर्म्सवर लावावी. याशिवाय कॉर्न स्टार्चमध्ये बेकिंग सोडा मिसळूनही डस्टिंग पावडर बनवता येते. जिथे जास्त घाम येतो, तिथे त्याचा वापर करू शकता. पण शरीरावर बेकिंग सोडा लावण्यापूर्वी पॅच टेस्ट जरूर करावी, त्यामुळे ॲलर्जी आहे की नाही ते समजू शकते.
लिंबू
लिंबाचा वापर फक्त खाण्यासाठी नव्हे तर घामाचा वास घालवण्यासाठीदेखील करता येतो. लिंबामध्ये नैसर्गिक रित्या सायट्रिक ॲसिड असते. ज्या जागी जास्त घाम येतो, त्या जागी कापसाच्या मदतीने लिंबाचा रस लावू ठेवा. त्यामुळे दुर्गंध निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. पण शेव्हिंग केल्यानंतर लगेच, तसेच जळलेल्या किंवा कापलेल्या जागेवर लावणे लिंबाचा रस लावणे टाळावे, कारण सायट्रिक ॲसिडमुळे जळजळ होऊ शकते.
ॲपल सायडर व्हिनेगर
ॲपल सायडर व्हिनेगरमधील नैसर्गिक अँटीबायोटिकमुळे, ते दुर्गंधी नाशका म्हणून एक उत्तम पर्याय आहे. ॲपल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. आता कापसाच्या मदतीने, जिथे जास्त घाम येते, त्या भागावर हे मिश्रण लावावे. तुम्हाला हवे असेल तर स्प्रे बॉटलमध्ये देखील हे मिश्रम भरून ठेवू शकता.
खोबरेल किंवा नारळाचे तेल
खोबरेल तेल शरीरातील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करते. जास्त घाम येणाऱ्या भागावर खोबरेल तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर ते त्वचेत शोषले जाईल व हळूहळू दुर्गंध कमी होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
