देश लहान कमाई महान… गोव्यापेक्षाही लहान देश, पण प्रत्येक माणूस कोट्यधीश, कसा होतो पैशांचा वर्षाव
जगात एक असं देश आहे जे गोव्यापेक्षा देखील लहान आहे. पण त्या देशातील प्रत्येक व्यक्ती कोट्यधीश आहे... देशातील प्रत्येक नागरिककडे आलिशान घर आणि गाड्या आहे... तर जाणून घ्या कोणता आहे तो देश...

भारतातील सर्वात लहान राज्य म्हणजे गोवा… पण गोव्यापेक्षा देखील एक लहान देश आहे. पण त्या देशातील प्रत्येक व्यक्ती गडगं श्रीमंत आहे. तर या देशाचं नाव आहे लक्झेंबर्ग…. लक्झेंबर्ग हा पश्चिम युरोपमध्ये स्थित देश आहे. तो 2,586 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला आहे. तो बेल्जियम, जर्मनी आणि फ्रान्सच्या सीमेवर आहे. सांगायचं झालं तर, क्षेत्रफळाच्या बाबतीत लक्झेंबर्ग हा एक छोटासा देश आहे. पण, देशातील प्रत्येक नागरिक दिवसेंदिवस श्रीमंत होत आहेत. जागतिक बँकेच्या 2024 च्या रिपोर्टनुसार, देशाची लोकसंख्या 6.78 लाख आहे. या देशातील लोकांच्या संपत्तीत दिवसागणिक कशी वाढ होत आहे… याबद्दल जाणून घेऊ..
प्रत्येक व्यक्तीचं किती आहे उत्पन्न…
जीडीपी बाबतीत हा देश सातत्याने जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांमध्ये स्थान मिळवतो. सीआयएच्या रिपोर्टनुसार, लक्झेंबर्गच्या प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न 1 कोटी 6 लाख 42 हजार आहे. एकेकाळी स्टील उत्पादनावर अवलंबून असलेल्या, या देशाची लोकसंख्या 6 लाख पेक्षा जास्त आहे… देश अलिकडच्या दशकांमध्ये युरोपमधील सर्वात प्रमुख गुंतवणूक व्यवस्थापन केंद्रांपैकी एक बनला आहे.
पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हे लक्झेंबर्गच्या जीडीपीमध्ये योगदान देतात. स्टील उत्पादन, जरी पूर्वीपेक्षा कमी महत्त्वाचं असलं तरी, ते एक प्रमुख रोजगार क्षेत्र आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की लक्झेंबर्ग श्रीमंत देश आहे, कारण देशात लोखंड आणि पोलाद उद्योग एकेकाळी समृद्ध होतं. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला या देशातील लोकं शेती व्यावसाय करत होते… तेव्हा त्यांचं आयुष्य फार कठीण होतं. पण स्टील व्यवसायात पदार्पण केल्यानंतर देशाचे चांगले दिवस आले…
अनेक कंपन्यांचं घर आहे लक्झेंबर्ग
युरोपियन युनियनमधील सर्वात लहान देशांपैकी एक असूनही, लक्झेंबर्ग हे अनेक मोठ्या कंपन्यांचे घर बनलं आहे. अनेक कंपन्यांनी याठिकाणी कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गुगल 2017 पासून लक्झेंबर्गमध्ये डेटा सेंटर बांधण्याची योजना करत आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे एक अब्ज युरो आहे आणि जमीन मालकांशी वाटाघाटी केल्यानंतर 2022 मध्ये त्याला पहिला हिरवा कंदील मिळाला. पण निकाल अद्याप अनिश्चित असला तरी, लक्झेंबर्गचे अर्थमंत्री लेक्स डेलेस यांच्या मते, गुगल अजूनही लक्झेंबर्गमध्ये डेटा सेंटर बांधू शकते.
Ferrero- लक्झेंबर्ग या कंपनीचं मुख्य कार्यालय आहे. कंपनी जवळपास 2 हजार लोकांना रोजगार देते. मायक्रोसॉफ्ट, फेसबूक आणि HSBC यांसारख्या कंपन्यांचे देखील या देशात मुख्य कार्यायल आहे.
लक्झेंबर्ग येथील पर्यटन
लक्झेंबर्गच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 2021 मध्ये, लक्झेंबर्गच्या जीटीपीने 1.2% थेट योगदान दिलं आणि 2019 मध्ये 38,617 नोकऱ्यांना आधार दिला, जे एकूण रोजगाराच्या 8.3% आहे.
लक्सटुडे या वेबसाइटनुसार, देशाची मालमत्ता अंदाजे 6 ट्रिलियन युरो किंवा 54 लाख कोटी युरोंपेक्षा जास्त आहे. यामध्ये 266 अब्जाधीशांची संपत्ती समाविष्ट आहे, जी युरोपियन युनियनमधील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.
दिवसागणिक कसा श्रीमंत होतोय हा देश?
मजबूत बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र
राजकीय आणि आर्थिक स्थिरता
युरोपमधील धोरणात्मक स्थान
स्टार्ट-अप्स आणि कर प्रणालीसाठी समर्थन
