AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरीच बनवा थंडगार आंब्याचे आईस्क्रीम, झटपट जाणून घ्या साहित्य आणि कृती

अंबे कोणाला आवड नसेल, असे कोणीच नसेल. आंबे वर्षातून एकदाच येतात आणि प्रत्येकाला आंबे आवडतात. आंब्यांचा सिझन असल्यांमुळे अनेक जण आंब्यांपासून वेगवेगळे पदार्थ देखील बनवत असतील, तर जाणून घ्या आंब्याचे आईस्क्रीम बनवण्याची रेसिपी...

घरीच बनवा थंडगार आंब्याचे आईस्क्रीम, झटपट जाणून घ्या साहित्य आणि कृती
| Updated on: Apr 25, 2026 | 2:46 PM
Share

अनेक जण बाहेरून आंब्याचे आईस्क्रीम विकत आणतात. पण तुम्ही घरात आंब्याचे आईस्क्रीम तयार करु शकाल. आंब्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी काय लागते, आंब्याचे आईस्क्रीम बनवायला किती वेळ लागतो… सर्वकाही जाणून घ्या… आंब्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिकलेले आंबे निवडा, ते स्वच्छ धुवा आणि त्याचे तुकडे करा. त्यात साखर, दूध, क्रीम किंवा कंडेन्स्ड मिल्क घाला. या सर्वांमुळे आईस्क्रीमला गोड चव येते. पिकलेले आंबे वापरल्याने त्याची नैसर्गिक चव अधिकच वाढते.

कापलेले आंबे मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी होईपर्यंत चांगले बारीक करा. त्यात साखर घालून हलक्या हाताने मिसळा. ही प्युरीच आईस्क्रीमचा मुख्य स्वाद तयार करेल. ती गुठळ्याविरहित आणि गुळगुळीत असणे महत्त्वाचे आहे. एका भांड्यात क्रीम घेऊन ते मऊ होईपर्यंत चांगले फेटून घ्या. नंतर त्यात आंब्याची प्युरी घालून हळूहळू मिसळा. आवश्यकतेनुसार दूध किंवा मिल्कमेड घालून चांगले मिसळा. यामुळे आईस्क्रीम क्रीमी होईल.

हे मिश्रण एका झाकण असलेल्या भांड्यात ओता आणि फ्रीझरमध्ये ठेवा. थोड्या वेळाने ते बाहेर काढून पुन्हा मिसळा. बर्फाचे खडे तयार होऊ नयेत म्हणून असे 2 – 3 वेळा करा. त्यानंतर, ते पूर्णपणे गोठू द्या म्हणजे आईस्क्रीम घट्ट होईल.

आईस्क्रीम गोठल्यावर, ते चमच्याने काढून वाट्यांमध्ये वाढा. वरून आंब्याच्या फोडी किंवा दट्टी-प्रुतीने सजवा. उन्हाळ्यात थंडावा आणि चव देणारा हा एक उत्तम गोड पदार्थ आहे. हा एक आरोग्यदायी गोड पदार्थ आहे जो घरी सहज बनवता येतो. अशात तुम्ही देखील घरी आंब्याचे आईस्क्रीम नक्की तयार करु बघा…

आंब्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी कोणता आंबा योग्य

हापूस, केशर आणि पायरी आंब्यांपासून तुम्ही आंब्याचे आईस्क्रीम तयार करु शकता. जर तुम्हाला क्रिमी, गडद रंगाचे आणि अतिशय सुगंधी आईस्क्रीम हवे असेल, तर हापूस आंबा सर्वोत्तम आहे. केशर आंबा हा रसाळ आणि गोड असतो, ज्यामुळे आईस्क्रीमला छान पिवळा रंग आणि उत्तम स्वाद येतो. पायरी हा आंबा रसाळ आणि चवीला आंबट-गोड असतो. आईस्क्रीम किंवा आमरस बनवण्यासाठी हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे.

Follow Us
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!