AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन वर्षांच्या स्वागताचा प्लॅन काय? समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणार असाल तर या टिप्स नक्की वाचा

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. तो कुठे साजरा करायचा यासाठी अनेकांचे प्लॅन झाले आहेत. जर तुम्ही बीचवर फिरायला जायच्या तयारी असला तर आज आम्ही तुम्हाला पॅकिंग करायला मदत करणार आहोत. जेणे करुन तुमची ही ट्रिप अविस्मरणीय राहिल.

नवीन वर्षांच्या स्वागताचा प्लॅन काय? समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणार असाल तर या टिप्स नक्की वाचा
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 6:54 PM
Share

मुंबई : मागील एक वर्ष कोरोनामुळे (Corona Virus) लोकांनी घरात काढलं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुठे जाता आलं नाही. त्यामुळे अनेक जण यावर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) वेगवेगळे प्लॅन करत आहेत. अनेक लोकांना बीचवर न्यू इयर पार्टी (New Year Party) करायला आवडतं. आपण अनेक वर्ष टीव्ही बघतो पण आहोत की समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्षाचा स्वागतासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. खास करुन कोकणात पर्यटकांची गर्दी होते. आणि न्यू इयर पार्टीसाठी मुंबईसह अनेक शहरातील लोकांची गोव्याला मोठ्या प्रमाणात पसंती आहे. जर तुम्ही पण गोव्याला जाणार असाल तर आम्ही तुम्हाला बॅग भरायला मदत करणार आहोत. अनेक वेळा आपण प्रवासाला जाताना नेमकं काय घेतलं पाहिजे हे कळतं नाही. मग अशा वेळी तुम्ही चिंता करु नका आम्ही तुम्हाला सगळी मदत करणार आहोत.

चला तर मग करुयात बीचवर जायची तयारी

1. सर्वप्रथम बीचवर जाण्यासाठी कशाप्रकारेचे कपडे असावे तर जे कपडे लवकर सुकतील. म्हणजे नॉयलानचे कपडे बेस्ट असतात. या कपड्यांच्या खरेदीसाठी तुम्ही जर मुंबईचे असाल तर वांद्रेतील लिकिंग रोड आणि कुलाबा इथे तुम्हाला बीचवर फिरण्यासाठी कपडे स्वस्त दरात मिळतील.

2. चप्पलबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी वाळू असल्याने साधी स्लिपर उत्तम असते. आणि सोबत एखादा साधा कापडी बूट असावा किंवा पाण्यात चालेल अशी चप्पल, बूट. बीचवर फिरण्यासाठी तुम्हाला छान चप्पल सुद्धा लिकिंग रोडला मिळेल.

3. सगळ्यात महत्त्वाचे बीचवर फिरायला जाताना हे वस्तू आवर्जून ठेवा. मिरर सनग्लासेस जे सुर्यप्रकाशापासून तुमचं संरक्षण करेल. त्यासोबत सनग्लासेसने तुमचं सौंदर्य खुलून दिसेल आणि बीचवरील फोटो, सेल्फी मस्ती निघतील.

4. हॅट किंवा टोपीसुद्धा तुम्ही सोबत ठेवा. कारण बीचवर तीव्र प्रकाश असतो अशावेळी या हॅट किंवा टोपीचा फायदा होतो.

5. त्यासोबत सनस्क्रिन लोशन पण आठवणीने ठेवा. बीचवर स्किन टॅन होते. त्यामुळे हे लोशन नक्की सोबत ठेवा.

6. कोकोनट ऑईल देखील सोबत ठेवा. समुद्रात खेळायला जाताना अंगाला आणि केसामध्ये कोकोनट ऑईल नक्की लावा. त्यामुळे तुमची त्वचा टॅन होणार नाही आणि केसाचंही नुकसान होणार नाही. समुद्रात खेळून झाल्यावर लवकरात लवकर आंघोळ करा.

7. तीव्र उन्हाळे आपली बॉडी हायड्रेटेड होते. मग अशावेळी पर्समध्ये ग्लुकोज पावडर ठेवा. ते पाण्यासोबत घेता येईल.

8. समुद्रकिनाऱ्यावर जाताना तुमच्या बॅगमध्ये व्हिनेगर जवळ ठेवा. कारण समुद्रात जेली फीश असते. ती चावल्यास जखमेला त्वरित व्हिनेगर लावा. तसंच प्रवासात कुठेही जाताना फर्स्ट ऐड बॉक्स कायम ठेवा

इतर बातम्या :

Breaking : नेमबाज कोनिका लायकचा गूढ मृत्यू! लग्नाची सुरु होती तयारी; अभिनेता सोनु सूदने गिफ्ट केली होती रायफल

ठाकरे सरकारनेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला, आशिष शेलारांचा हल्लाबोल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.