AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Year 2025 : नव्या वर्षाच्या पार्टीला जायचंय? मग हा ड्रेस नक्की ट्राय करा, परीच दिसाल

नवीन वर्षाच्या पार्टीसाठी काय घालावे याबाबत अनेक महिला गोंधळलेल्या असतात. या लेखात आम्ही तुम्हाला बोलीवूड अभिनेत्रींच्या स्टायलिश आउटफिट्सची माहिती देत आहोत. कृति सेननचा ऑरेंज को-ऑर्ड सेट, शिल्पा शेट्टीचा वन-शोल्डर गाउन, कॅटरिना कैफचा शॉर्ट ड्रेस आणि सुहाना खानचा शिमरी गाउन यांसारख्या आकर्षक पर्यायांचा समावेश आहे. या लूक्स तुम्हाला तुमच्या पार्टी लुकसाठी प्रेरणा देतील.

New Year 2025 : नव्या वर्षाच्या पार्टीला जायचंय? मग हा ड्रेस नक्की ट्राय करा, परीच दिसाल
| Edited By: | Updated on: Dec 28, 2024 | 8:43 PM
Share

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वांनीच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट सज्ज झाले आहेत. अनेकजण अजूनही हॉटेलची बुकिंग करत आहेत. पण त्यांना बुकिंग मिळत नाहीये. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी जाण्याचा प्लान आखला जात आहे. अनेक ठिकाणी तर भव्यदिव्य पार्ट्या होणार आहेत. त्यासाठीही लोकांनी तयारी केली आहे. ख्रिसमसची धमाल केल्यानंतर आता नववर्षाच्या पार्टीमोडमध्ये लोक गेले आहेत.

असं असलं तरी पार्टीत काय घातलं पाहिजे? यामुळे मुली बऱ्याच कन्फ्यूज्ड असतात. तुम्हाला जर नव वर्षाच्या पार्टीत जायचं असेलतर तुम्ही बी टाऊन सेलिब्रिटीचे आऊटफिट पाहून आयडिया घेऊ शकता. नव्या वर्षाच्या पार्टीत तुम्ही या अभिनेत्रींचा लुकआऊट रिक्रिएट करू शकता. कोणत्या अभिनेत्रींचा कोणता आऊटफिट भारी आहे, याचीच आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

कृतिचा ऑरेंज को-ऑर्ड सेट

कृति सेननचा रस्ट ऑरेंज को-ऑर्ड सेट पार्टीसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. तिच्या को-ऑर्ड सेटमध्ये एसिमॅट्रिक टॉप सुद्धा आहे. कृतिने मिनिमल एक्सेसरीजसोबत तिचा लुक कम्प्लिट केला आहे. कोहल आय मेकअप आणि न्यूड लिप शेडमुळे तिचं सौंदर्य खुलून उठलं आहे.

शिल्पाचा वन शोल्डर गाउन

फॅशनच्या बाबतीत शिल्पा शेट्टीचा हात कुणीच पकडणार नाही. ती पार्टीत वन शोल्डर स्लीव्ह असलेला मरून शिमर ड्रेस परिधान करते. तिच्या हातात ब्रेसलेटची ग्रेस सुंदर दिसते. शिल्पाने नेपर्ल वर्क चोकर नेकलसे सुद्धा पेयर केलं आहे.

कॅटरीनाचा शॉर्ट ड्रेस

कॅटरीना कैफचा सिल्वर स्ट्रॅपी ड्रेस नवीन वर्षाच्या पार्टीसाठी परफेक्ट आहे. तिचा शॉर्ट ड्रेसमध्ये डीप व्ही नेकलाइनची डिटेलिंग देण्यात आली आहे. तिने फ्रिजी हेअरस्टाइल सोबत गोल्डन मेकअप पेअर केला आहे. कॅटच्या कानात स्टोन स्टडेड इरिंग्स घातले आहेत. त्यामुळे तिचा लूक अधिकच भारी वाटतोय.

सुहाना खानचा लॉन्ग गाउन

सुहाना खानचा ब्लॅक शिमरी गाउन अत्यंत सुंदर आहे. या गाउनमध्ये तिचे कर्व्स सुद्धा फ्लॉन्ट होत आहेत. सुहाना खानने हाईलायटेड चीक्स आणि स्लीक मिडल पार्टींगसह तिचा लुक पूर्ण केला आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.