AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीलगिरीचे तेल आरोग्याबरोबरच त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा !

नीलगिरीच्या तेलामुळे आपण आरोग्याच्या अनेक समस्या ह्या दुर करू शकतो. नीलगिरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.

नीलगिरीचे तेल आरोग्याबरोबरच त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा !
नीलगिरीचे तेल
| Edited By: | Updated on: May 29, 2021 | 7:09 AM
Share

मुंबई : नीलगिरीच्या तेलामुळे आपण आरोग्याच्या अनेक समस्या ह्या दुर करू शकतो. नीलगिरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे एक चांगले अँटी-सेप्टिक म्हणून देखील काम करते. त्याच्या वापरामुळे अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात. हे तेल अँटी-बॅक्टेरियल असल्याने, ते दात आणि हिरड्या यामधील संक्रमण काढून टाकते. सर्व टूथपेस्ट आणि माऊथवॉशमध्ये नीलगिरी तेल वापरले जाते. (Nilgiri oil is extremely beneficial for the skin)

विशेष म्हणजे हे नीलगिरीचे तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नीलगिरीचे तेल आपण दररोज त्वचेला लावले तर आपली त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल. नीलगिरीच्या तेलाचा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दही, बेसन पीठ आणि नीलगिरीचे तेल लागणार आहे. या फेसपॅकसाठी बेसन पीठ, दही आणि नीलगिरीचे तेल मिक्स करा त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी देखील मदत करते. या तेलाला ‘फिवर ऑईल’ असेही म्हणतात. ताप येत असेल तर हाता-पायांचे तळवे आणि कपाळावर नीलगिरीचे तेल व्यवस्थित लावावे आणि चादरीने शरीर झाकून घ्यावे.

थोड्याच वेळात, आपल्याला घाम येणे सुरू होईल आणि ताप कमी होईल. नीलगिरीचे तेल सायनस, सर्दी, फ्लू, घसा खवखवणे, दम्याचा त्रास आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या समस्यांमध्ये आराम देते. अशा समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी, गरम पाण्यात त्याचे काही थेंब टाकून वाफ घ्यावी. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे हे तेल त्वचेचे संक्रमण कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचा मऊ आणि डाग मुक्त होते. हे तेल ज्या ठिकाणी संक्रमण होते तेथेच थेट लावले जाऊ शकते. पण, तेल लावताना त्वचा जास्त घासू नका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Nilgiri oil is extremely beneficial for the skin)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.