AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅन्डेज फक्त जखमेवर नाही, ‘या’ 6 कमाल कामांसाठीही वापरता येतं

आपल्या घरातल्या फस्टएड बाॅकेसमध्ये बॅन्डेज नेहमी असते. अनेकांना वाटते की ते फक्त जखमेवर लावण्यासाठी आहे, पण हे पूर्णपणे सत्य नाही! हे छोटेसे बॅन्डेज तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकते. चला, बॅन्डेजचे काही भन्नाट 'हॅक्स' जाणून घेऊया!

बॅन्डेज फक्त जखमेवर नाही, 'या' 6 कमाल कामांसाठीही वापरता येतं
फक्त जखमेसाठी नाही! बॅन्डेजचे 'हे' 6 स्मार्ट उपयोग जाणून घ्या, रोजच्या अडचणी होतील दूर!Image Credit source: TV9 Network/प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 01, 2025 | 7:25 PM
Share

आपल्या घरातल्या प्रथमोपचार पेटीत बॅन्डेज नेहमीच असते. अनेकांना वाटते की ते फक्त जखमेवर लावण्यासाठी आहे, पण हे पूर्णपणे सत्य नाही! हे छोटेसे बॅन्डेज तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकते. चला, बॅन्डेजचे काही भन्नाट उपाय जाणून घेऊया, जे तुमचं आयुष्य सोपं करतील आणि तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील!

बॅन्डेजचे 6 कमाल उपयोग, जे रोजचे जीवन सोपे करतील:

1. अनेकदा नवीन चपला, सँडल किंवा बॅली घातल्यावर टाचांना किंवा बोटांना घासून जखमा होतात, ज्यामुळे चालणेही कठीण होते. या समस्येवर सोपा उपाय म्हणजे, बॅन्डेज पादत्राणांच्या आतमध्ये, जिथे घासते तिथे चिकटवा. यामुळे त्वचेला रग लागणे थांबेल आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

2. बस किंवा रेल्वे प्रवासात, किंवा डोंगरावर जाताना अनेकांना उलटीचा त्रास होतो. अशावेळी, बॅन्डेजवर औषधी तेलाचे काही थेंब टाकून ते मनगटावर चिकटवा. उलटी थांबेल! एवढंच नाही, घसा दुखत असेल तर घशावर, आणि नाक बंद असेल तर नाकावर हेच बॅन्डेज चिकटवा, श्वास घ्यायला सोपं जाईल.

3. मुलींना आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन्सचे कपडे घालावे लागतात, पण कधीकधी चुकीचा क्षण येऊ शकतो. वरच्या कपड्यातून आतल्या कपड्यांच्या पट्ट्या दिसत असतील, तर बॅन्डेजने त्या त्वचेला चिकटवा, त्या दिसणार नाहीत. स्कर्ट किंवा लहान ड्रेस वारंवार उडत असेल, तर बॅन्डेजने मांडीला चिकटवा, ड्रेस जागेवर राहील.

4. मोबाईल किंवा लॅपटॉपचे चार्जर वारंवार वाकल्याने तुटतात, खासकरून टोकाकडून. हे तुटण्यापासून वाचवण्यासाठी, बॅन्डेज गोल करून चार्जरच्या तारेवर, जिथे ती तुटते तिथे चिकटवा. यामुळे तार मजबूत आणि सुरक्षित राहील, आणि चार्जर जास्त काळ टिकेल.

5. ओठ फुटण्याची समस्या असेल, तर रात्री झोपताना बॅन्डेजवर व्हॅसलीन लावून ओठांवर चिकटवा. सकाळी उठल्यावर ओठ मऊ होतील आणि मृत त्वचा निघून जाईल. डोळ्यांचा मेकअप करताना ‘आयलाइनर’ किंवा ‘आयशॅडो’ लावण्यासाठी साधन नसेल, तर बॅन्डेजची पट्टी डोळ्यांवर मार्गदर्शक म्हणून वापरू शकता.

6. दागिने व्यवस्थित बसवण्यासाठीही बॅन्डेजचा वापर होतो. हार खूप लांब असेल आणि त्याला गळ्यात व्यवस्थित बसवायचे असेल, तर बॅन्डेजने त्याला ‘फिक्स’ करा. दागिन्याचा एखादा टोकदार भाग त्वचेला टोचत असेल, तर त्या भागावर बॅन्डेजचा छोटा तुकडा कापून चिकटवा, तो टोचणार नाही आणि कट लागणार नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.