‘जागतिक हायपरटेन्शन डे’ : हायपरटेन्शन बद्दल समज आणि तथ्य

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

मुंबई : हायपरटेन्शन हा हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक, मूत्रपिंड रोग आणि पायातील धमन्यांमध्ये ब्लॉकेजसाठी वेदनादायक आणि गँगरीन होणारा सर्वात मोठा आणि टाळता येणारा धोका आहे. 2014 च्या सर्वेक्षणानुसार, भारताच्या संपूर्ण लोकसंख्येच्या 18 वर्षापर्यंतची 25 टक्के भारतीय लोक हायपरटेन्शनने ग्रस्त असल्याचं दिसून आलं आहे. ही टक्केवारी 2017 मध्ये उच्च रक्तदाब मार्गदर्शनातील बदलांनुसार खूप जास्त असल्याचं मानलं […]

'जागतिक हायपरटेन्शन डे' : हायपरटेन्शन बद्दल समज आणि तथ्य
हायपर टेन्शन म्हणजे काय?
Follow us

मुंबई : हायपरटेन्शन हा हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक, मूत्रपिंड रोग आणि पायातील धमन्यांमध्ये ब्लॉकेजसाठी वेदनादायक आणि गँगरीन होणारा सर्वात मोठा आणि टाळता येणारा धोका आहे. 2014 च्या सर्वेक्षणानुसार, भारताच्या संपूर्ण लोकसंख्येच्या 18 वर्षापर्यंतची 25 टक्के भारतीय लोक हायपरटेन्शनने ग्रस्त असल्याचं दिसून आलं आहे. ही टक्केवारी 2017 मध्ये उच्च रक्तदाब मार्गदर्शनातील बदलांनुसार खूप जास्त असल्याचं मानलं जातं. हायपरटेन्शनच्या मर्यादा आता सिस्टोलिक दाब 130 एमएचएचजीपेक्षा वर आणि डायस्टोलिक दाब 80 मिमीएचजी वर करण्यात आल्या आहेत.

हायपरटेन्शन बद्दल बरेच गैरसमज आहेत, जे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहेत. हायपरटेन्शन नियंत्रित करण्याचा एक सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे स्वत:ला त्याबाबत शिक्षित करणे.

आज 17 मे रोजी जगभरात ‘जागतिक हायपरटेन्शन डे’ साजरा केला जात आहे.

जरी लक्षण दिसत नसली तरी ही, मला ब्लड प्रेशरची तपासणी करण्याची गरज आहे का? 40 वर्षांनंतरच मी माझे रक्तदाब तपासले पाहिजे का?

हायपरटेन्शन हा ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणं न जाणवता बऱ्याच वर्षांपासून उच्च रक्तदाब असतो. तो शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवांमधील रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवित असतो. काही रुग्णांना हायपरटेन्शनमुळे डोकेदुखी, हृदयाचे ठोके कमी जास्त होणे, छातीत दुखणे आणि श्वासोच्छ्वासात त्रास यासारख्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो.

18 वर्षांच्या वयापासूनच हायपरटेन्शनची तपासणी करायला हवी. कारण, लहान वयोगटातही जीवनशैलीतील बदलांमुळे हायपरटेन्शन वाढण्याची शक्यता असते.

मला हायपरटेन्शनचा कौटुंबिक इतिहास आहे. मी देखील हायपरटेन्शन विकसित करू शकतो का, किंवा मी ते टाळण्यासाठी काहीतरी करू शकेन का?

हायपरटेन्शनचा ठोस कौटुंबिक इतिहास असणे यामुळे आपल्याला लहान वयातच हायपरटेन्शन विकसित करण्याचा धोका वाढवतो. तथापि निरोगी जीवनशैलीतील बदलामुळे हायपरटेन्शन होण्यास विलंब किंवा टाळण्यास मदत होऊ शकते.

मी माझ्या जेवणातील मीठ प्रतिबंधित केल आहेते पुरेसे आहे का? समुद्रातील मीठ किंवा कोशेर आणि नियमित जेवणातील मीठ यांच्यामध्ये काही फरक आहे का?

आपल्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासाठी मीठ प्रतिबंध ही सर्वात महत्वाची आणि प्रभावी पद्धत आहे. प्रतिदिन मिठाच्या सेवनाचे प्रमाण 4-6 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. मीठ प्रतिबंधित करणे म्हणजे सोडियम (Na) प्रतिबंधित करणे. जेवणातील मिठा शिवाय सॉस, पॅकेज केलेले अन्न, चिप्स, जंक फूड यांसारख्या खाद्य पदार्थांमधून आपण बरेचसे अप्रत्यक्ष मिठाचे (अंदाजे 75%) सेवन केले जाते. तयार किंवा पॅक खाद्यपदार्थ खरेदी करताना नेहमी सोडियमचे (Na) प्रमाण पाहणे गरजेचे आहे. उच्च प्रमाणातील सोडियमरहित पदार्थ टाळले पाहिजेत.

कोशेर मीठ आणि टेबल मीठ समान असतात. दोन्हीमध्ये 40 टक्के सोडियम असते.

अल्कोहोल हृदय आणि रक्तदाबसाठी चांगले आहे का?

अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन करणे हायपरटेन्शन, स्ट्रोक, हृदय फेल्युअर, अनियमित हृदयाचे ठोके, उच्च कोलेस्ट्रॉल, कर्करोग आणि अपघात होण्यास कारणीभूत आहे. दारु पिण्यासाठी पुरुषांकरिता दररोज 2 मानक ड्रिंक आणि महिलांसाठी दररोज 1 मानक पेय प्रतिबंधित केले पाहिजे. 1 मानक पेय 14 ग्रॅम शुद्ध अल्कोहोल समतुल्य असते, जे आपल्याला 12 औन्स नियमित बियर, वाइन 4 औन्स आणि डिस्टिल्ड स्पिरिट्सचे 1.5 औन्समध्ये असते.

जर माझे रक्तदाब नियंत्रणात असेल तर मी माझी औषधे घेणे थांबवू शकतो का? मला यासाठी औषधे आयुष्यभर घ्याव लागतील का? आयुष्यभर घेतल्यास या औषधांचा साइड इफेक्ट होऊ शकतो का

औषधांच्या मदतीने आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात आले असले, म्हणून आपण औषधे थांबवू नये, असे करणे हानिकारक असू शकते. कारण, अचानक औषधे थांबवल्याने आपला रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतो.

हायपरटेन्शन हा एक आजीवन रोग आहे. म्हणून औषधे आयुष्यभर चालू ठेवली पाहिजेत. निरोगी जीवनशैलीत बदल झाल्यास औषधांची मात्रा कमी करता येते किंवा कधीकधी थांबवता येते. परंतू हे आपल्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली करावे.

औषधांचा दुष्परिणाम होऊ शकतो, परंतू प्रत्येकाला याचा अनुभव येतोच असं नाही. डॉक्टर नियमितपणे दुष्परिणामांचे परीक्षण करतील आणि औषधे बदलल्यास किंवा डोस वाढल्यास रक्त तपासणी करण्याचा सल्ला देतील. परंतू अनियंत्रित ब्लड हायपरटेन्शनमुळे अधिक नुकसान होते, म्हणून आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधे थांबवू नका/बदलू नका.

मी माझ्या रक्तदाबचे निरीक्षण कसे करावे?

आपल्या ब्लड प्रेशरवर नियमितपणे नियंत्रण ठेवणे आणि ते नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे. तुमच्या डॉक्टरांकडे भेटीदरम्यानच नव्हे, तर नियमितपणे आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी देखील रक्तदाब तपासला पाहिजे. आपल्या शरीराची क्रियाकल्प पातळी, तणाव / चिंता यानुसार रक्तदाब पातळी वाढते. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री रक्तदाब तपासणे देखील महत्वाचे आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे रक्तदाब पातळी अनेक वेळा मोजली गेली पाहिजे आणि ती एकसारखी नियंत्रणात असली पाहिजे. विस्तृत चढ-उतार टाळले पाहिजे. डॉक्टर 24 तास अॅबब्युलेटरी बी.पी. देखरेख करण्याचे सल्ला देऊ शकतात.

आपला रक्तदाब कमी करण्यासाठी सोडियम सेवन, निरोगी आहारासह – अधिक फळे / भाज्या, नियमित शारीरिक क्रिया, वजन कमी करणे, अल्कोहोलचा सेवन कमी करणे, धूम्रपान थांबवणे, योग / ध्यान आणि नियमित औषधे, ताण नियंत्रित करणे आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

लेखक : डॉ. निकेश डी जैन, कार्डियोलॉजिस्ट सल्लागार, जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर 

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI