
रोजच्या टिफिनसाठी काय नवीन आणि चवदार द्यावं, याची चिंता असणाऱ्या आईंसाठी हा आर्टीकल खूप उपयोगी आहे. आता मुलांना कंटाळवाण्या पराठ्यांऐवजी टेस्टी आणि हेल्दी पनीर टिक्का सॅंडविच द्यायला विसरू नका. या रेसिपीत दही, मसाले, पनीर, शिमला मिर्ची आणि कांदा वापरून तयार होणारं हे सॅंडविच केवळ चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. शिवाय याला जास्त वेळ लागत नाही आणि झटपट तयार होतं.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा
या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आहे एक कप क्यूब्समध्ये कापलेलं पनीर, अर्धा कप गार दही, एक चमचा आलं – लसूण पेस्ट, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, धने पावडर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, बारीक चिरलेली शिमला मिर्ची, कांद्याचे स्लाईस, ब्रेड स्लाईस, हरी चटणी, बटर आणि पनीर शिजवण्यासाठी थोडं तेल.
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये दही घ्या आणि त्यात सगळे मसाले, लिंबाचा रस मिसळा. त्यात पनीर, कांदा आणि शिमला मिर्ची टाका आणि 15 – 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करा. नंतर पॅनमध्ये तेल गरम करून हे मॅरिनेटेड मिश्रण हलकंसं शिजवा, पण पनीर जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर ते हार्ड होईल.
ब्रेडवर टिक्का, चटणी आणि कुरकुरीत मजा
आता ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला हिरवी चटणी आणि दुसऱ्या बाजूला बटर लावा. त्यावर पनीर टिक्का मिश्रण पसरवा आणि दुसरी स्लाईस ठेवून प्रेशर द्या. हे सॅंडविच तव्यात किंवा ग्रिल पॅनवर दोन्ही बाजूंनी बटर लावून कुरकुरीत होईपर्यंत शेकावं.
हे सॅंडविच मुलांच्या टिफिनमध्ये टमाटर सॉस, मस्टर्ड किंवा हरी चटणीसह द्यायला विसरू नका. वरून थोडंसं चाट मसाला शिंपडल्यास चव अजून वाढते. जर मुलांना चीज आवडत असेल तर थोडं किसलेलं चीज टाकल्यास सॅंडविच आणखी मस्त लागतं.
टिफिनच्या पलीकडेही याचा उपयोग
हे सॅंडविच केवळ टिफिनपुरतंच मर्यादित नाही, तर ते संध्याकाळच्या वेळेस स्नॅक्स म्हणून, पाहुण्यांना देण्यासाठी किंवा वीकेंडवर कुटुंबासाठी बनवायलाही उत्तम पर्याय आहे. हे केवळ स्वादिष्टच नाही, तर पचनासाठी हलकं, कमी तेलाचं आणि फक्त काही मिनिटांत तयार होणारं आहे.