चविष्ट आणि निरोगी ब्रेकफस्ट हवा, नाश्त्यात पीनट बटरचा करा असा समावेश
पीनट बटरमध्ये प्रथिने, हेल्दी फॅट आणि फायबर भरपूर प्रमाणात असते जे दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी बरेचजण त्यांच्या रोज नाश्त्यात पीनट बटरचा समावेश करतात. तुम्ही पीनट बटरचा तुमच्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. चला जाणून घेऊयात.

पीनट बटर हे केवळ चवीसाठीच नाही तर पौष्टिकतेसाठी देखील एक पॉवरफूल मानले जाते. कारण यामध्ये प्रथिने, हेल्दी फॅट, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला केवळ ऊर्जा प्रदान करत नाहीत तर स्नायूंच्या दुरुस्ती आणि मानसिक आरोग्यास देखील फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही देखील तुमच्या नाश्त्यात पीनट बटरचे सेवन करावे. याच्यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे अस्वास्थ्यकर स्नॅक्सची खाण्याचर इच्छा कमी होते. तर आजच्या या लेखात आपण पीनट बटर पासून असे काही पदार्थ बनवता येतात ज्यांचा तुम्ही नाश्त्यात समावेश करू शकता. चला तर निरोगी आणि चविष्ट नाश्त्यात पीनट बटरचा वापर कशा पद्धतीने करू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात-
फळांसह पीनट बटर टोस्ट
टोस्टवर पीनट बटरचा लावा आणि त्यावर केळी, स्ट्रॉबेरी किंवा सफरचंदाचे पातळ काप ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावर चिया बियाणे किंवा मध टाकू शकता. हे मिश्रण फायबर आणि प्रथिने समृद्ध आहे.
पीनट बटर ओटमील
गरम ओट्समध्ये एक चमचा पीनट बटर टाका आणि त्यावर बारीक केलेले काजू आणि सीड्स टाकून हेल्दी नाश्ता करू शकता. अशा नाश्त्यातून हळूहळू ऊर्जा बाहेर पडते, ज्यामुळे तुम्ही बराच काळ फ्रेश राहता.
पीनट बटर केळी स्मूदी
पीनट बटर केळी स्मूदी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात केळी, दूध, 1 चमचा पीनट बटर आणि थोडे मध मिक्स करून स्मूदी बनवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चिया बियाणे किंवा कोको पावडर टाकू शकता. वर्कआउटनंतर फ्रेश वाटण्यासाठी व शरीरात ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी ही स्मूदी एक उत्तम पर्याय आहे.
पीनट बटर चिया पुडिंग
रात्रभर भिजवलेल्या चिया बियांमध्ये पीनट बटर, दही आणि मध मिक्स करून एक क्रिमी पुडिंग बनवा . त्यावर बारीक काप केलेली फळे देखील मिक्स करून खाऊ शकता. हा फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिडने समृद्ध नाश्ता असू शकतो.
पीनट बटर पॅनकेक्स
तर हा पॅनकेक्स बनवण्यासाठी तुमच्या नेहमीच्या पॅनकेक बॅटर मध्ये पीनट बटर मिक्स करून बनवा. यामुळे पॅनकेक अधिक निरोगी बनतात आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत.
पीनट बटर पराठा
गव्हाच्या पिठामध्ये पीनट बटर आणि थोडासा गूळ मिक्स करून पराठे बनवा. मुलांसाठी आणि प्रौढांसाठी हा एक चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता पर्याय आहे.
पीनट बटर ग्रीक दही बाऊल
ग्रीक दह्यामध्ये पीनट बटर मिक्स करा आणि त्यावर ग्रॅनोला आणि फळं टाका. हा कमी कार्ब आणि उच्च प्रथिने असलेला नाश्ता आहे, जो तुमचे चयापचय प्रक्रिया देखील वाढवतो.
पीनट बटर ग्रॅनोला बार
ओट्स, नट्स, मध आणि पीनट बटर मिक्स करून घरी ग्रॅनोला बार बनवा. नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्ससाठी हे एक परिपूर्ण ऊर्जा बूस्टर आहे.
पीनट बटर आणि सफरचंदाचे काप
सफरचंदाच्या कापांवर पीनट बटर लावा आणि त्यावर थोडे चिया किंवा अळशीचे बियाणे टाका. हा एक जलद, कमी कॅलरी आणि फायबरयुक्त निरोगी नाश्ता आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
